शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बॅनर्सवर नजर ठेवण्यासाठी विशेष क्रमांक

By admin | Updated: December 19, 2014 01:26 IST

बॅनरबाजांवर नजर ठेवून त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अखेर न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पालिकेने हेल्पलाइन आणली आहे़

मुंबई : बॅनरबाजांवर नजर ठेवून त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अखेर न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पालिकेने हेल्पलाइन आणली आहे़ मात्र या विशेष क्रमांकाबाबत अद्याप लोकांना फारशी माहिती नसल्याने दहा दिवसांत २२ तक्रारीच दाखल झाल्या आहेत़ मुंबईत रस्ते, चौक, नाक्यांवर झळकणाऱ्या होर्डिंग्जमध्ये ८० टक्के बेकायदेशीर असतात़ या जाहिरातबाजीतून पालिकेला महसूल मिळत नाही, याउलट शहराचे सौंदर्यही बाधित झाले आहे़ या प्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबईला बॅनरबाजीतून मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त सीताराम कुंटे यांनी अर्थसंकल्पातून केला़ त्यानुसार बॅनरबाज राजकीय पक्षांविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यासही सुरुवात झाली़राजकीय बॅनर्सवर बंदी आणणारे धोरणच प्रशासनाने तयार केले़ मात्र राजकीय अनास्थेमुळे अद्याप या धोरणावर शिक्कामोर्तब झालेले नाही़ त्यामुळे निवडणुकीच्या काळात राजकीय बॅनरयुद्धच मुंबईत रंगले़ यावर तीव्र पडसाद उमटताच पालिका प्रशासनाने १२९२ हा विशेष क्रमांक ६ डिसेंबरपासून सुरू केला आहे़ त्यानुसार आपल्या वॉर्डात अनधिकृत बॅनर्स दिसल्यास त्याबाबत नागरिकांना तत्काळ या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे़ राजकीय जाहिरातींची डोकेदुखीनेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा, जयंती, पुण्यतिथी, नियुक्त्या अथवा सण-उत्सवाच्या शुभेच्छा, मेळावे अशी राजकीय पक्षांची जाहिरातबाजी शहरभर सुरू असते़ या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने आपले दिखाऊ काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बॅनर्स लावण्यात राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू होती़ त्यानंतर आता विजयी उमेदवारांना शुभेच्छ, मतदारांचे आभार अशा जाहिरातबाजीने मुंबईला विद्रूप केले आहे़ (प्रतिनिधी)