शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

काही तरी कर ठाणेकर, कधी होणार शहर स्मार्ट

By admin | Updated: October 28, 2015 23:00 IST

आरक्षित असलेला रिंग रोड पूर्ण केल्याशिवाय ठाण्याला स्मार्ट सिटीचे वैभव प्राप्त होणार नाही.

घोडबंदर : आरक्षित असलेला रिंग रोड पूर्ण केल्याशिवाय ठाण्याला स्मार्ट सिटीचे वैभव प्राप्त होणार नाही. हा रस्ता गेल्या ३० वर्षात होऊ शकलेला नसल्याने तो मोठा अडसर स्मार्ट सिटीच्या मार्गात बाधक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून वाहतुकीच्या समस्येवर आयकॉनिक प्रोजेक्ट उभे करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरु आहे. यामध्ये मेट्रो, एमआरटीएस (मास रेल ट्रान्झीट सिस्टीम), एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झीट रोड), जलवाहतूक, पार्किंग प्लाझा, ओवळा डेपो सुधारणा अशा वाहतूक योजनांचा समावेश आहे.यापूर्वीच्या आयुक्तांनी रिंग रेल्वे, एलआरटी, बीआरटीएस, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटची ठाणेकरांना दाखवलेली स्वप्ने विस्मरणात जात नाही तोच आता पुन्हा स्मार्ट सिटीच्या नावाने योजनांचा पाऊस पाडण्याचे धोरण पालिकेने हाती घेतल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून वेळोवेळी शासनाने मंजूर केलेल्या शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंड विकसित करण्यास प्रशासनाला पूर्ण यश आलेले नाही. आराखड्यात असलेला रिंग रेल्वे मार्ग केला असता तरी वाहतुकीच्या समस्येवर तोडगा निघाला असता. हा मार्ग मेंटल हॉस्पिटल, मुलुंड चेकनाका, रोड नंबर १६, २२, पोखरण रोड,पातलीपाडा बाळकुम, खारटन रोड, ठाणे स्टेशन असा आहे.गेली काही वर्षापासून मागणी असलेल्या विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशनसाठी जागा उपलब्ध झालेली नाही.रिंग रेल्वेसाठी पाच कोटी खर्च करून योजना मागे पडली आहे. शासनाकडे मागणी केलेली मेंटल हॉस्पिटलची १७ एकर जागा ताब्यात आली नसल्याने कुठचीही योजना मार्गी लागू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील दाखवला आहे.परंतु प्रत्यक्षात निविदा काढल्यानंतर ती धावण्यासाठी सात वर्षांचा कालवधी लागेल. त्यामुळे मेट्रोने प्रवास करण्याचे भाग्य उजळण्यास दहा वर्षे लोटणार आहेत.