शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

..तर स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:56 IST

कल्याण : कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक ...

कल्याण : कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना केल्या. सन्मानपूर्वक जागावाटप झाले तर मनपा निवडणूक महाविकास आघाडीतून लढू अन्यथा स्वबळावर लढण्यासाठीही सज्ज राहा, असेही त्यांनी सांगितले.

केडीएमसीची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार होती. परंतु, कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने निवडणूक कधी होईल, याबाबत साशंकता आहे. दरम्यान, यापूर्वी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये मुंबईत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली होती. यावर पक्षाचे कोकण विभाग प्रभारी बी. एन. संदीप यांनी वॉर्डनिहाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा, अशी सूचना जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांना केल्या होत्या. त्याप्रमाणे अहवालही सादर करण्यात आला आहे. परंतु, कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही.

दरम्यान, मुंबईतील राजीव गांधी भवनमध्ये बुधवारी पटोले यांनी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तीन तास चाललेल्या या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याला मत मांडण्याची संधी देण्यात आली. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद कमकुवत आहे, त्यामुळे स्थानिक समस्यांवर भर देत जनसंपर्क वाढवा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला आल्या पाहिजेत, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत, अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. मनपा निवडणुकीच्या वेळी विशेष लक्ष घालणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीला सचिन पोटे, ब्रीज किशोर दत्त, कांचन कुलकर्णी, संतोष केणे, प्रकाश मुथा, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, सदाशिव शेलार, नवीन सिंग आदी उपस्थित होते.

---------

पक्ष वाढवण्याचे आव्हान

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने २००५ मध्ये केडीएमसीत अडीच वर्षे का होईना सत्तेत असलेल्या काँग्रेसची कालांतराने अधोगती झाली. महापालिका निवडणुकीत १९९५ मध्ये काँग्रेसचे १६,२००० मध्ये १८, २००५ मध्ये २१,२०१० ला १५ तर, २०१५च्या निवडणुकीत तर अवघे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष वाढविणे आणि अधिकाधिक नगरसेवक निवडून आणणे हे आव्हान स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पटोलेंच्या पुढेही राहणार आहे.

------------------