सूरज परमार आत्महत्याप्रकरणी एसआयटी स्थापन करणार

By Admin | Updated: February 12, 2016 04:17 IST2016-02-12T04:17:36+5:302016-02-12T04:17:36+5:30

बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) मकरंद

SIT will be set up in Suraj Parmar suicide case | सूरज परमार आत्महत्याप्रकरणी एसआयटी स्थापन करणार

सूरज परमार आत्महत्याप्रकरणी एसआयटी स्थापन करणार

ठाणे : बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) मकरंद रानडे यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीमध्ये
२ सहायक पोलीस आयुक्त, २ पोलीस निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. परमार प्रकरणात अटकेत असलेल्या चारही नगरसेवकांकडील त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्तेची चौकशी ही एसआयटी करणार आहे.

Web Title: SIT will be set up in Suraj Parmar suicide case