शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या राजकारणात पुन्हा सिंधी कार्ड

By admin | Updated: December 31, 2016 03:47 IST

ओमी कलानी टीमच्या झंझावाताचा धसका घेत उल्हासनगरात पुन्हा सिंधी भाषक राजकारणाने उचल खाल्ली असून एरवी मराठीचा नारा देणाऱ्या शिवसेनेनेही महापौरपदासाठी

उल्हासनगर : ओमी कलानी टीमच्या झंझावाताचा धसका घेत उल्हासनगरात पुन्हा सिंधी भाषक राजकारणाने उचल खाल्ली असून एरवी मराठीचा नारा देणाऱ्या शिवसेनेनेही महापौरपदासाठी सिंधी समाजाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपामधील मराठी भाषक नगरसेवकांत नाराजी परसली आहे. भाजपाने बंडखोरांना चुचकारत शिवसेना, रिपाइंसोबत युतीची चर्चा सुरू ठेवली आहे. आठवडाभरात जागावाटप पूर्ण करून प्रचाराला लागायचे, तरच ओमी टीमला टक्कर देता येईल, अशी त्यांची रणनीती आहे. ओमी कलानी यांचा भर सिंधीभाषक राजकारणावर आहे. त्यासाठी त्यांची आधीपासून तयारी सुरू आहे. सिंधी अस्मिता आणि गेल्या दहा वर्षांत उल्हासनगरात न झालेली विकासकामे हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असेल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना पुढे करून विकासाच्या पॅकेजची, योजनांची घोषणा करायची. अगदी उल्हासनगरात मेट्रो आणण्याचे आश्वासन द्यायचे आणि दहा वर्षांतील अकार्यक्षम कारभारावरील लक्ष दुसरीकडे वळवायचे. त्याचवेळी सिंधीभाषक व्यक्तीला महापौरपद देण्याची घोषणा करून त्या भाषकांची एकगठ्ठा मते ओमी यांच्या पारड्यात पडणार नाहीत, अशी व्यूहरचना सुरू आहे. सुरूवातीला शिवसेनेशी युतीबाबत भाजापाचे स्थानिक नेते फारसे अनुकूल नव्हते. त्यामुळे शिवसेनेने परस्पर रिपाइंशी वाटाघाटी सुरू केल्या. भाजापामुळे मंत्रीपद मिळालेल्या आठवलेंनी लगोलग आपल्या नेत्यांना समज देत भाजपासोबत जाण्याचे आदेश दिले. मात्र शिवसेनेचा पवित्रा पाहून भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीही नमते घेत युतीच्या वाटाघाटी सुरू केल्या.उल्हासनगरमधील युतीत रिपाइं सोबत असल्याने भाजपा मोठा भाऊ आहे. गेल्यावेळी प्रत्येकी ३३ जागा वाटून घेणाऱ्या शिवसेना-भाजपाला चार प्रभागांचा एक प्रभाग असलेल्या स्थितीत जागांच्या वाटणीवर तोडगा काढावा लागेल. शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी आहे, भाजपाकडे आर्थिक आणि भाषक ताकद मोठी असल्याचा त्यांच्या नेत्यांचा दावा आहे. सद्यस्थितीत साई पक्ष ओमी कलानी यांच्या सोबत आहे. गेले सहा महिने शिस्तबद्ध रितीने कलानी यांचे काम सुरू आहे. त्यांना अडवायचे असेल, तर सिंधी कार्डाचे राजकारण खेळण्याचा पर्याय भाजपा-शिवसेनेपुढे आहे. भाजपा नगरसेविका जया मखिजा, हरेश जग्यासी, महेश सुखरामानी, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, राम चार्ली यांचे प्रभाग सिंधीबहुल असून त्यावर ओमी कलानी यांची पकड आहे. त्यामुळेच भाजपाने सिंधी कार्ड हाती घेतले आहे. (प्रतिनिधी) सिंधी समाजाला प्राधान्यमहायुतीची ८० टक्के बोलणी झाली आहेत. जागावाटप आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. उल्हासनगरवर भाजपाचाच महापौर असेल, असे ते म्हणाले; तर शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही महापौरपदासाठी सिंधी समाजाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. सिंधी समाजातील तरूणांना तिकिट देऊन शिवसेना त्यांना जिंकून आणेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील युतीत भाजपा-शिवसेनेच्या जागा समान, पण यश निम्मेचगेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा व रिपाइंची युती झाली. तेव्हाच्या ७८ जागांपैकी सेना-भाजपाला प्रत्येकी ३३, तर १२ जागा रिपाइंच्या आठवले गटाला दिल्या होत्या. शिवसेनेचे-२०, रिपाइंचे-चार; तर भाजपाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे बंडखोर राजा वानखडे, सुनील सुर्वे, विजय पाटील अपक्ष म्हणून निवडून आले होते.सत्तेसाठी साई पक्षाने पाठिंबा देत आशा इदनानी यांच्या रूपाने महापौरपद पदरात पाडून घेतले होते. महायुतीच्या १० वर्षाच्यार् काळात भाजपाला महापौरपद न मिळाल्याने यावेळी भाजपाचाच महापौर असेल, असा नारा पक्षाने दिला आहे; तर सिंधी समाजाला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने त्या पक्षात सिंधी-मराठी वाद उफाळण्याची शक्यता आहे.