शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडच्या मुख्य चौकातील सिग्नल महिनाभर बंद

By admin | Updated: January 3, 2017 05:34 IST

मीरा भाईदर मधील सिग्नल वारंवार बंद पडतात. तसेच ते त्वरेने सुरु करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने वाहतुक पोलिसांनी सबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द

मीरा रोड : मीरा भाईदर मधील सिग्नल वारंवार बंद पडतात. तसेच ते त्वरेने सुरु करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने वाहतुक पोलिसांनी सबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी थेट पालिका आयुक्तांकडे केली आहे. वाहतूक कोंडी टळावी, वाहतुकीच्या नियमांचे पालन तसेच वाहतुकीचे नियोजन व्हावे म्हणुन सुमारे १९ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवली आहे. शहराचा मुख्य मार्ग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर काशिमीरा नाका ते सावरकर चौका पर्यंत १० सिग्नल आहेत. सिग्नल यंत्रणेच्या देखभाल - दुरुस्तीचे काम हे पालिकेने युटीलीटी इंटरनिटी या ठेकेदार कंपनीस दिले आहे. तसेच यासाठी १० लाखांची तरतूदही केली आहे. सिग्नल यंत्रणा बंद पडल्यास वा त्याच्या वेळेत बदल करायचा असल्यास वाहतुक पोलिस थेट ठेकेदारास कळवतात. सिग्नल यंत्रणा वाहतुकीच्या दृष्टीने गरजेची असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असते. परंतु ठेकेदारास वारंवार कळवूनही सिग्नल दुरुस्ती करण्यास विलंब होतो. सिग्नल बंद पडल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडून पडते व वाहतूक कोंडी होते. शिवाय तैनात वाहतूक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डनला वाहन चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळात तर वाहतुकीचे नियोजन अवघड होते. यात चालकांकडून मोटार वाहन कायद्याचा सर्रास भंग होतोच शिवाय सिग्नल मोडणाऱ्यांविरुध्द कारवाई करणे शक्य होत नसल्याने शासनाचा महसूलही बुडतो. या बाबत वाहतूक पोलिसांनी ४ नोव्हेंबरला पत्रान्वये पालिकेकडे ठेकेदाराची तक्रार केली. सध्या सावरकर चौक व दिपक रुग्णालया चौका समोरील सिग्नल बंद आहेत. वाहतुक पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांनी पुन्हा आयुक्तां कडे लेखी तक्रार करुन नाराजी व्यक्त केली आहे. प्रमुख चौकातील सिग्नल बंद असल्याचे कळवूनही त्वरेने दुरुस्ती होत नसल्याने वाहतुकीचे नियोजन व नियम पाळणे अवघड जात आहे. तरी नवीन सिग्नल यंत्रणा बसविणे, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निविदा मागवून अटीशर्तींची पूर्तता करणाऱ्या ठेकेदारास काम द्यावे, असे चौगुले यांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर यांनी तसे पत्र आल्याचे माहीत नसून तपासून सांगतो, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)