शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातही घडणार नेमबाज

By admin | Updated: February 27, 2016 02:34 IST

गेली अनेक वर्षे ठाणे शहरात प्रलंबित असलेला ‘रायफल शूटिंग रेंज’चा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ठाणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग रेंज उभारण्याच्या निर्णयाला स्थायी

मुंबई : गेली अनेक वर्षे ठाणे शहरात प्रलंबित असलेला ‘रायफल शूटिंग रेंज’चा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ठाणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग रेंज उभारण्याच्या निर्णयाला स्थायी सभेत मंजुरी देण्यात आली आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील कै. खंडू रांगणेकर इमारतीच्या तळमजल्यावर ही रायफल शूटिंग रेंज उभारण्यात येणार आहे, अशी माहिती ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी दिली.फेबु्रवारी महिन्याच्या सुरुवातीला ठाण्यात कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘लोकमत’ने ठाण्यातील खेळाडूंसाठी पायाभूत सुविधांबाबत आवाज उठवताच ठाणेकरांनी त्याला पाठिंबा दिला. ठाणे शहरात आजघडीला एकही शूटिंग रेंज नसल्याने शूटिंग क्षेत्रात करिअर बनवू पाहणाऱ्या शूटर्सना मुंबईकडे धाव घ्यावी लागत होती. आता मात्र ही पायपीट थांबणार असून, ठाण्यातच ‘शूटिंग स्टार’ घडतील. महापौर मोरे यांनी या प्रकरणी लक्ष देऊन रायफल शूटिंग रेंज उभारण्यासाठी वेगाने पावले उचलली. स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. आयुक्तांनी परवानगी देताच हा प्रस्ताव समितीपुढे मांडून तत्काळ मंजुरी देण्यात आली. ठाण्यात उभारण्यात येणारी रायफल शूटिंग रेंज ही वातानुकूलित असणार आहे. एकाच वेळी १६ खेळाडू एका रांगेत उभे राहून सराव करण्याची व्यवस्था या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजमध्ये करण्यात आली आहे; शिवाय खेळाडूंना सराव करताना पाहण्यासाठी पालकांसाठीदेखील विशेष व्यवस्था करणार असल्याची माहिती महापौर मोरे यांनी दिली. त्याचबरोबर सिंथेटिक टॅ्रक आणि अन्य प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन मोरे यांनी ठाणेकरांना दिले. (क्रीडा प्रतिनिधी)