शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात वास्तू सल्लागार कार्यालयातील मंदिरच केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 22:29 IST

सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरु असतांनाच ठाण्यात मात्र एका वास्तू सल्लागार कार्यालयातील चांदीच्या मंदिरासह चांदीची वाटी आणि त्यातील चांदीचे देवीचे नाणे लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देऐन नवरात्रोत्सवातच चांदीच्या देवीच्या नाण्याचीही चोरीकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका बंद असलेल्या वास्तू सल्लागार कार्यालयाचा टाळा तोडून चोरटयांनी चांदीच्या मंदिरासह चांदीची वाटी आणि त्यातील चांदीचे देवीचे नाणे लंपास केल्याची घटना ढोकाळी परिसरात घडली. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात बुधवारी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड रेसिडेंन्सी येथील रहिवाशी गणेश सिलीवेरू (५७) यांचे जी.एस. इस्टेट कंन्सलटंट हे कार्यालय ढोकाळी येथील हायलँड एनेक्स येथे आहे. याच कार्यालयाचे अज्ञात चोरटयांनी १९ आॅक्टोबर रोजी रात्री ११.३० ते २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास टाळे तोडून कार्यालयात शिरकाव केला. या कार्यालयातील चांदीचा पत्रा असलेल्या ५० हजारांच्या लाकडी मंदिरासह प्रत्येकी एक हजाररु पये किमतीची चांदीची वाटी आणि लक्ष्मीचा शिक्का असा ५२ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २१ आॅक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मोसमकर हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी