शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे नाक्यावरील हॉटेल पालिकेने केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:59 IST

मीरा रोड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता मीरा- भाईंदर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून, वरसावे नाका, घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस ...

मीरा रोड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता मीरा- भाईंदर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून, वरसावे नाका, घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन या हॉटेलमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने पालिकेने सील केले आहे. या हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य ग्राहकांचा शोध घेणे अवघड होणार आहे.

मीरा - भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरीच्या काळात कमी झाल्यानंतर महापालिका व पोलीस प्रशासनाकडूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे बंद झाले. दुसरीकडे बेशिस्त नागरिकांसह अनेक नगरसेवक, राजकारणीही सर्रास नियमांचे उल्लंघन करत विनामास्क वावरत आहेत. त्यातूनच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच नेहमी गर्दी असणाऱ्या वरसावे नाका, घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन या बड्या हॉटेलातील २१ कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले. त्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिकेचे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी १८ फेब्रुवारीपासून ४ मार्चपर्यंत हॉटेल इमारतच सील केली आहे. तसे आदेश त्यांनी हॉटेलच्या दर्शनी भागात लावले आहेत.

या घटनेने खळबळ उडाली असून, या हॉटेलात रोज येणाऱ्या असंख्य ग्राहकांना शोधणे अवघड झाले आहे. कारण कोरोनाग्रस्त हॉटेल कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. सरकारचे हॉटेल व कर्मचाऱ्यांसाठी दिलेले निर्देश स्पष्ट असले तरी त्याचे काटेकोर पालन केले जात नाहीत.