शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ला भिवंडीतूनही विरोध

By admin | Updated: October 13, 2016 03:40 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास शहापूरपाठोपाठ भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही विरोध करण्यास सुरुवात केली

भिवंडी : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास शहापूरपाठोपाठ भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही विरोध करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पिसे चिराडपाडा येथे उपजिल्हाधिकारी रेवती गायकर आल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्या समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने त्यांना बैठक आटोपती घ्यावी लागली.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांच्या भागीदारीतून उभा करण्याचे गाजर सरकारकडून दाखवले जात आहे. सरकारच्या भूलथापांना बळी न पडण्याच्या पवित्र्यात स्थानिक शेतकरी आहे. पिसे चिराडपाडा येथील शेतकऱ्यांच्या सुमारे १०० एकर शेतजमिनी संपादित केल्या जाणार असून येथील शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी गायकर या पिसे चिराडपाडा येथे आल्या होत्या. या प्रसंगी भिवंडी तहसीलदार वैशाली लंभाते, मंडळ अधिकारी चंद्रकांत राजपूत उपस्थित होते. हा महामार्ग भिवंडी तालुक्यातील उसरोळी, वडपे, बोरिवली, आमणे, पिसे चिराडपाडा या पाच महसुली गावांतून जाणार आहे. याकरिता, शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करायच्या आहेत. परंतु, या परिसरातून मुंबई-नाशिक महामार्ग, गॅस पाइपलाइन, वडोदरा-जेएनपीटी महामार्ग, उच्चदाबाच्या वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहक तारांचे टॉवर तसेच मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीसाठी पिसे येथील हजारो एकर शेतजमीन सरकारने संपादित करून येथील शेतकऱ्यांना भूमिहीन केले. पण, शेतकऱ्यांना योग्य मोबदला सरकारने व संबंधितांनी दिला नाही. तसेच नोकरीही दिली नाही. (प्रतिनिधी)