शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील महावितरणचे रोहित्र बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:42 IST

त्यात झाडेझुडपे वाढलेली लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एमआयडीसीमधील महावितरणचे बहुतांशी रोहित्र अतिधोकादायक बनली आहेत. ते रस्ते व ...

त्यात झाडेझुडपे वाढलेली

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एमआयडीसीमधील महावितरणचे बहुतांशी रोहित्र अतिधोकादायक बनली आहेत. ते रस्ते व इमारतींच्या कडेला असून, बहुतेक ठिकाणी त्यांचे संरक्षक कुंपण तुटल्याने एखादे वाहन त्यावर धडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच झाडेझुडपे व परिसरात पडलेला कचरा याला आग लागल्यास अपघातही घडू शकतो.

अशाच तांत्रिक कारणांकडे दुर्लक्ष केल्याने यापूर्वी गेल्या वर्षभरात अनेक वेळा रोहित्राला आग लागून स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. वेळोवेळी पत्र देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन सांगूनही देखभाल होत नसल्याची खंत तेथील रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केली.

नियमित साफसफाई, रोहित्रामधील ऑइल याची तपासणी योग्य वेळी झाली पाहिजे. रोहित्राला लागणारे किमती ऑइल रोहित्रामधून काढून चोरणारे समाजकंटक त्या ठिकाणी कुंपण नसल्याचा फायदा घेत असल्याचे ते म्हणाले. अशा अतिधोकादायक, देखभाल होत नसलेल्या रोहित्राची माहिती स्थानिक एमआयडीसी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी देऊनही त्यांच्याकडून कार्यवाही होताना दिसत नाही. काही वेळेस हे सर्व आमचा सिव्हिल खात्याकडे किंवा वरिष्ठांना पत्र देऊन कळवितो, असे महावितरणचे अधिकारी तोंडी सांगतात. मात्र, खरेच असे पत्र दिले आहे का, हे मात्र समजू शकलेले नसल्याचे ते म्हणाले. सध्या उन्हाळा असल्याने वीज वितरणवर ताण येत आहे. आताही काही भागात तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. वाढत उष्मा, वर्क फ्रॉम होम तसेच काही जण कोरोनामुळे घरातच विलगीकरणात आहे. त्यात वीजपुरवठा नसल्यास नागरिक मेटकुटीला आले आहेत. येथील रोहित्राच्या स्थितीबद्दल वारंवार महावितरणचा वरिष्ठ अभियंत्यांना फोटोसह समाजमाध्यमांवर, मोबाइलवर कळवण्यात येत असूनही कार्यवाही का होत नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे नलावडे म्हणाले.

--------------