शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरात दोरी पकडून रस्ता ओलांडा’, ठामपाचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:28 IST

शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते.

ठाणे : शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, बुधवारी त्यांनी नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, ७५ टक्केच सफाई झाल्याचे समोर आले. त्यामुळे उर्वरित २५ टक्के कामे केव्हा पूर्ण होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. संतापजनक प्रकार म्हणजे नितीन कंपनी, किसननगर भागात पावसाच्या पुरात रस्ता ओलांडण्यासाठी लोखंडी खांब उभारून त्याला दोरी बांधावी, आणि ती धरून नागरिकांनी रस्ता ओलांडावा, असा अजब सल्ला महापालिकेने दिला आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना ठाण्यात सुरुवात झाली. ही कामे कुठवर आली आहेत, याची पाहणी बुधवारी आयुक्त जयस्वाल यांनी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तीनहातनाका, मॉडेला चेकनाका, किसननगर, साठेनगर, सावरकरनगर, नितीन कंपनी या परिसरात पाहणी केली. त्यानुसार, कामे ७५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत ती समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.>सफाई कामगारांच्या सुरक्षेची पोलखोलमान्सूनपूर्वी ठाणे महापालिका हद्दीत नालेसफाईची लगबग सुरू आहे. पावसाचे पाणी सहज आणि पटकन वाहून जावे, यासाठी नाल्यातील गाळ, कचरा काढण्यात येतो. मात्र, नाल्यात उतरून सफाई करणारे कामगार हातमोज्यांऐवजी प्लास्टिक पिशव्या घालून काम करत असल्याचे या सफाई दरम्यान निदर्शनासआले. तर, काही ठिकाणी कर्मचारी चक्क पोहत असताना आयुक्तांच्या पाहणी दौºयात दिसले. ठेकेदारांकडून सफाई कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे पाहायला मिळाले. ठाणे महापालिकेच्या हद्दीत शहराची स्वच्छता करणारे महापालिकेचे सुमारे ८०० हून अधिक सफाई कामगार काम करतात. पावसाळ्याच्या तोंडावर सध्या या सर्व कर्मचाऱ्यांना गटारांमधील गाळ काढण्याचे काम दिले आहे. ते करताना आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी हातमोजे घालणे बंधनकारक आहे. तसेच काम करताना त्यांना तोंडावर लावण्यासाठी मास्कदेखील नसल्याची गंभीर बाब बुधवारी आयुक्तांच्या दौºयाप्रसंगी माध्यमांच्या लक्षात आली.>संरक्षक भिंतीअभावी माती पुन्हा नाल्यातमेट्रोच्या कामामुळे पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीएने स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा ठेवावी, अशा सूचना त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना दिल्या.तीनहातनाका येथील पनामा कंपनीजवळील नाल्याची सुरुवातीला पाहणी केली. या नाल्यातील कचरा काढण्यात आला आहे. मात्र, या नाल्याभोवती संरक्षक भिंत नसल्याने बाजूची माती नाल्यात पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे नाल्यात मातीचा गाळ साचून पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सावरकरनगर आणि साठेनगर भागातील नाल्यात कचºयाचे ढीग असून ते काढण्याचे काम सुरू होते. येथे रोबोट मशीनच्या साहाय्याने कचरा काढण्यात येत होता.