शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणी-रिक्षाचालकाची हाणामारी

By admin | Updated: July 8, 2017 04:00 IST

आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळे संतापलेल्या एका १९ वर्षीय प्रवासी तरुणीने महेंद्र पितळे (४९, रा. आझादनगर, कॅसलमिल, ठाणे) या

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळे संतापलेल्या एका १९ वर्षीय प्रवासी तरुणीने महेंद्र पितळे (४९, रा. आझादनगर, कॅसलमिल, ठाणे) या रिक्षाचालकाशी वाद घातला. याच वादातून त्याने तिला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान, या तरुणीनेही आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पितळेने ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.
खोपट भागातून जाणाऱ्या पितळेच्या शेअर रिक्षात ही तरुणी सकाळी बसली. खोपटच्या चौकातून तिने चरईला रिक्षा नेण्याचा आग्रह धरला. त्याने मात्र रिक्षा टेंभीनाका मार्गे जाईल, असे स्पष्ट केले. तिला दगडी शाळेकडे जायचे असल्यामुळे त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्याने तिला मूस चौकात मारहाण केली. यामुळे तिनेही त्याला मारहाण केली. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर मुलीने आधी मारहाण केल्यानंतर आपणही तिला मारल्याचा दावा रिक्षाचालकाने केला. तर त्यानेच आपल्याला मारहाण केल्याची उलट तक्रार या तरुणीने दिली. या मुलीने जो मार्ग दाखविला होता, तो ‘नो एन्ट्री’चा होता. त्यामुळेच रिक्षा जाऊ शकत नव्हती, असेही पितळे याने स्पष्ट केले. पोलिसांनी अखेर दोघांविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार नोंदविली असून साधी अदखलपात्र तक्रार असल्यामुळे कोणालाही अटक केलेली नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

रिक्षाचालकांची वाढती अरेरावी
राबोडीच्या सिकंदर शेख या रिक्षाचालकानेही नौपाड्यातील तरुणीचा बुधवारी रात्री नजरेने इशारा करून विनयभंग केला. तिने याचा जाब विचारत त्याच्या श्रीमुखात लगावली होती. त्यानेही चूक कबूल करण्याऐवजी तिला जबर मारहाण केली. या प्रकरणी मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर शेखला पोलिसांनी अटक केली. अवघ्या एक दिवसाच्या आत पुन्हा तरुणीला मारहाणीचा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.