शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

नातेवाईकच निघाला चोर, रोकडसह ५८ हजारांचा ऐवज हस्तगत, उधारी चुकवण्यासाठी केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 8:31 PM

हार्डवेअरच्या व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे आपल्याच मेहुण्याकडे चोरी करणा-या कमलेंदर सिंग हुलावत याला कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

 ठाणे  - हार्डवेअरच्या व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे आपल्याच मेहुण्याकडे चोरी करणा-या कमलेंदर सिंग हुलावत (२८, रा. किंजल, दिघा, नवी मुंबई) याला कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून रोकडसहित ५८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.कळव्याच्या न्यू शिवाजीनगर येथील विनायक चाळीत राहणारे रूपसिंग राठोड (३६) यांच्या घरात २५ आॅक्टोबरला सकाळी ७.३० ते २६ आॅक्टोबरला रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली. यामध्ये ६८ हजारांची रोकड, अर्धा तोळा सोन्याचे मंगळसूत्र तसेच काही दागिने असा ८२ हजारांचा ऐवज चोरीस गेला. याप्रकरणी राठोड यांनी २७ आॅक्टोबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्यासमवेत काही नातेवाईकही होते. त्यात त्यांच्या बहिणीचे पती कमलेंदर (मेहुणे) यांचाही समावेश होता. या चोरीचा तपास लवकर लावावा, असा आग्रहदेखील त्यांनी पोलिसांकडे धरला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, निरीक्षक तुकाराम पवळे, अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे उपनिरीक्षक संजय पाटील यांनी राठोड यांच्या घराची पाहणी केली. तेव्हा या घराची चावी कोणाकडे असते, आणखी कोणकोण नातेवाईक तिथे आले? या सर्व बाबींची चौकशी त्यांनी केली. तेव्हा संशयाची सुई कमलेंदर यांच्याकडेच आली. तरीही, आपण त्या गावचे नसल्याचा आव आणणाºया या मेहुण्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. याच चौकशीत त्याने या चोरीची अखेर कबुली दिली. हार्डवेअरच्या व्यवसायात तोटा झाल्यामुळे अनेकांची मोठ्या प्रमाणात उधारी झाली होती. ही उधारी चुकवण्यासाठी देणेदारांनी तगादा लावला होता. मग, जितक्या पैशांची गरज होती, तेवढीच रोकड आणि दागिन्यांची चोरी केली, असा दावाही त्याने पोलिसांकडे केला. त्याच्याकडून चोरीतील सर्व १५ हजारांचे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४३ हजारांची रोकड असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. २७ आॅक्टोबरलाच त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक