शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाने दिलासा देऊनही १५ कोटी भरण्याची नामुष्की

By admin | Updated: January 5, 2016 01:58 IST

उल्हास व वालधुनी नदीसह कल्याण खाडीतील प्रदूषणाकरिता राष्ट्रीय हरित लवादाने कल्याण-डोंबिवली महापालिकेस १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता

कल्याण : उल्हास व वालधुनी नदीसह कल्याण खाडीतील प्रदूषणाकरिता राष्ट्रीय हरित लवादाने कल्याण-डोंबिवली महापालिकेस १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. दंडाची ही रक्कम भरण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला असून त्याकरिता कोकण विभागीय आयुक्तांकडे एस्क्रो अकाउंट उघडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.हरित लवादाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, राज्य सरकारने हा दंड भरलाच पाहिजे, असा आदेश काढल्याने महापालिकेने दंड भरण्याची तयारी दर्शविली आहे. वनशक्ती या पर्यावरण संस्थेच्या वतीने हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. औद्योगिक कारखान्यांतून रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न करता ते थेट नदी व खाडीपात्रात सोडले जाते. त्यामुळे कल्याण खाडी, उल्हास आणि वालधुनी नदी प्रदूषित झाली आहे. या प्रकरणी लवादाने वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळाचे कान उपटले. तसेच काही कारखाने बंद करण्याच्या नोटीस देऊन पुन्हा त्यांच्याकडून बँक गॅरंटी घेऊन ते कारखाने सुरू करण्याची मुभा दिली. लवादाने दीड वर्षाच्या सुनावणीपश्चात नदी व खाडीचे प्रदूषण करणाऱ्यांना जवळपास १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. त्यात कल्याण-डोंबिवलीला १५ कोटींचा दंड ठोठावला होता. त्याचबरोबर डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्रास ३० कोटी, उल्हासनगर महापालिकेस १५ कोटी, अंबरनाथ पालिकेस पाच कोटी, बदलापूर पालिकेस पाच कोटी, अंबरनाथ सांडपाणी प्रक्रिया केंद्रास १५ कोटी, औद्योगिक विकास महामंडळास १० कोटीचा दंड ठोठावला होता. यापैकी एकाही स्थानिक संस्थेने दंड भरण्याची तयारी दर्शविली नाही. डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्राने हरित लवादाने ठोठावलेल्या दंडाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने दंड भरण्यास स्थगिती आदेश दिला होता. या आदेशामुळे सगळ््यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता.