शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांच्या पॅकेजिंगचे २५ कोटींचे साहित्य हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:15 IST

कॉपीराइट कायदा : बड्या कंपन्यांची उत्पादने असल्याचे भासवून लूट?

भिवंडी : तालुक्यातील गोदामपट्टा अशी ओळख असलेल्या वळगावच्या हद्दीतील वळपाडा येथील पारसनाथ कम्पाउंडमधील गाळा क्रमांक ८ येथे एचपी, कॅनॉन, सॅमसंग व इप्सोन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे २५ कोटींहून अधिक रकमेचे पुठ्ठ्याचे साहित्य बुधवारी दुपारी छापा टाकून जप्त करण्यात आले. एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस संकुलात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

किशोर आंबा बेरा (वय २८ वर्षे, रा. गणेशचाळ, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या पारसनाथ कम्पाउंड येथील गोदामात एचपी, कॅनॉन, सॅमसंग व इप्सोन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे २५ कोटींहून अधिक किमतीचे पुठ्ठ्याचे केवळ रिकामे बॉक्स गोदामात ठेवल्याचे छापा टाकून हा माल जप्त केल्याने उघडकीस आले. या ठिकाणी अनधिकृत पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले असल्याची खबर भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळाली असता त्यांनी नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून सदर मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर कॉपीराइट अ‍ॅक्ट १९५७ चे कलम ५१ व कलम ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कॉपीराइट अ‍ॅक्टअन्वये करण्यात आलेल्या देशातील मोठ्या कारवायांपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग करण्यासाठी वापरले जाणारे बनावट पुठ्ठे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे संकेत पोलिसांनी दिले असून, यात बडे मासे अडकण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत २५ कोटींपेक्षा अधिक रकमेचे नामांकित कंपन्यांचे प्रिंट केलेले पुठ्ठ्यांचे बॉक्स पत्रकार परिषदेत मांडले. पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेले हे साहित्य पाहून सारेच अवाक झाले. या गोदामात ठेवलेल्या या पुठ्ठ्यांचा वापर करून नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांऐवजी कमी प्रतीची उत्पादने नामांकित कंपन्यांची असल्याचे भासवून त्याची विक्री केली जात होती किंवा कसे, या दृष्टीने आता पोलीस तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण