शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ठाण्यात आता सेना-मनसेमध्ये पोस्टर वॉर; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 7:54 PM

आज ठाणेकरांना तीन हात नाका येथे पोस्टर वॉर पाहायला मिळाला.

ठळक मुद्देएकीकडे पालकमंत्री यांच्या कार्याचे दाखले देणारा तर त्याच्या बाजूला अविनाश जाधव कधी थांबणार नाही असे म्हणणारे होर्डिंगस लागले आहेत.

ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री यांच्यावर मनसैनिकांकडून टीका करण्यात येत आहे. अलिकडे शिवसेनेनेही त्यांच्या टीकेला उत्तर दिले. काही दिवसांपासून सुरू असलेला सोशल मीडियावरचा वॉर आता पोस्टरवर आला आहे. आज ठाणेकरांना तीन हात नाका येथे पोस्टर वॉर पाहायला मिळाला. एकीकडे पालकमंत्री यांच्या कार्याचे दाखले देणारा तर त्याच्या बाजूला अविनाश जाधव कधी थांबणार नाही असे म्हणणारे होर्डिंगस लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांची ही श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची प्रतिक्रिया ठाणेकरांनी दिली. 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आल्यानंतर आणि त्यांना अटक झाल्यानंतर मनसैनिकांकडून पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. सोशल मीडियावर ही शाब्दिक युद्ध सुरू होते. त्या आधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी मनसैनिकांकडून केली जात होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे राम रेपाळे यांनीही त्यांच्या टिकेला उत्तरे देऊन पालकमंत्री यांच्यावर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे असे म्हटले होते. दोन्ही पक्षातील वाद अद्याप मिटलेला नाही हे तीन हात नाका येथे लावण्यात आलेल्या होर्डिंगस वरून दिसून येत आहे. 

सेना - मनसे यांनी एकमेकांच्या बाजूला लावलेले होर्डिंगस ठाणेकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भविष्यात वाद चिघळण्याची शक्यता आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोविडच्या परिस्थितीत राजकारण करून श्रेय घेण्यापेक्षा नागरिकांच्या हिताची कामे करणे आवश्यक आहे. ठाणेकरांना सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात रस नसल्याचे त्यांनी सांगितले. 

तीन हात नाका येथे आम्हीच होर्डिंग लावले आहे. यात कोणावर आरोप न करता पालकमंत्री यांचे काम दाखविले आहे. मनसेने पालकमंत्री यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जी टीका केली त्याला या होर्डिंगसच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेत आम्हाला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण दिली आहे. पण मनसे आमच्या 20 टक्के राजकारणाला घाबरले आहे. पुढे नाकावरून पाणी गेल्यास पालकमंत्री यांचे मार्गदर्शन घेऊनच पाऊल उचलणार. - मृणाल रेपाळे, शिवसैनिक

 तीन हात नाक्याला लावलेल्या होर्डिंग मधून पालकमंत्री याना आम्ही उत्तर दिले आहे. आमच्या बॉसवर जो अन्याय केला त्याच्यावर ती प्रतिक्रिया होती. जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. - करण खरे, मनसैनिक 

मनसेकडून पालकमंत्री यांच्यावर एकेरी उल्लेख करीत, वैयक्तिक पातळीवर टीका आणि खोटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांनी कोरोनाकाळात केलेले काम दाखविणारे होर्डिंगस युवा सेनेच्यावतीने नितीन कंपनी येथे लावले आहे. - निखिल कणसे, शिवसैनिक 

महापालिकेने जरी खोटा गुन्हा जाधव यांच्यावर दाखल केला तरी त्यामागचा बोलवता धनी वेगळा आहे. सत्ताधारी आणि पालकमंत्री यांनी दबावतंत्र वापरून हा गुन्हा दाखल केला. परंतु ठाणेकर हे सत्याच्या बाजूनेच उभे राहतील. - दिनेश मांडावकर, मनसैनिक 

आताचे संकट पाहता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. परंतु तसे दिसत नाही, ही श्रेयवादाची लढाई आहे. ठाणेकरांना तुमचे राजकारण नको तर त्यांना त्यांचे प्रश्न सोडवून हवे आहेत. तुम्ही काय केले याचा ढोल वाजविण्यापेक्षा ठाणेकरांचे प्रश्न सुटलेत की नाही याकडे लक्ष द्यावे. - मकरंद जोशी, सुज्ञ ठाणेकर 

सत्ताधारी असो वा विरोधक यांचे डावपेच ठाणेकरांच्या हिताचे नाही. कोणतीही आंदोलने करा पण ती सनदशीर मार्गाने करावी. ठाणेकरांना सर्व दिसत आहे. सध्याचे जे आरोप किंवा टीका सुरू आहेत त्यातुन ठाणेकरांना कोणताही फायदा होणार नाही. ठाणेकरांना कोणती मदत करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - जगदीश खैरालिया, सुजाण नागरिक 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेShiv Senaशिवसेना