शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पतपेढी निवडणुकीला चढला राजकीय रंग

By admin | Updated: October 12, 2016 04:27 IST

मीरा-भार्इंदर नगरपालिका काळात १९९४-९५ मध्ये पतपेढीची स्थापन झाली. संचालक मंडळाची निवडणूक १६ आॅक्टोबरला होत आहे. यंदाची निवडणूक

भार्इंदर/मीरा रोड : मीरा-भार्इंदर नगरपालिका काळात १९९४-९५ मध्ये पतपेढीची स्थापन झाली. संचालक मंडळाची निवडणूक १६ आॅक्टोबरला होत आहे. यंदाची निवडणूक राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची झाली आहे. पतपेढीचा कारभार हाती घेण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.गणेश नाईक समर्थक व माजी नगरसेवक प्रकाश दुबोले यांनी १९८६ मध्ये श्रमिक कामगार सेनेच्या बॅनरखाली कामगारांना एकत्र आणले. कामगारांना मिळणारे वेतन रोखीने दिले जात असल्याने वेतन वाटपावेळी कामगारांच्या हाती येणारी अधिक रक्कम सावकारांच्या हाती जात होती. यामुळे कामगार बेजार झाले. दुबोले यांनी १५० कामगारांना एकत्र आणून १९९४-९५ मध्ये पतपेढीची स्थापना केली. त्यावेळी पतपेढीची उलाढाल १० ते १५ लाखांची होती. पतपेढीतून कामगारांना कर्ज वितरीत होऊ लागल्याने त्यांची सावकारांच्या विळख्यातून सुटका झाली. सेनेच्या ताब्यातील पतपेढी शरद रावप्रणीत संघटनेच्या हाती आली. नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर १९९० मध्ये कामगार सेनेने पालिकेत प्रवेश केला. १६ वर्षे पतपेढीचा कारभार सुरू असतानाच कामगारांमध्ये दोन गट निर्माण झाले. त्यामुळे २००६ मधील संचालक मंडळाच्या निवडणुकीला राजकीय गालबोट लागले. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत काही स्थानिक मातब्बर राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळे म्युनिसिपल कामगार संघटनेचे पॅनल विजयी झाले. कामगारांनी या संघटनेला रामराम ठोकत रयतराज कामगार संघटनेला २०१४ मध्ये मान्यता दिली. २१ वर्षांच्या कारभारात काही लाखांची उलाढाल १० कोटींवर गेल्याने संघटनावाढीला सुरुवात झाली. २०१५ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने, तर २०१६ मध्ये आमदार नरेंद्र मेहताप्रणीत श्रमिक जनरल कामगार संघटनेने पालिकेत शिरकाव केला. संघटना सक्रिय होताच मेहता यांनी यंदाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चवाथे यांच्या बोगसगिरीला सहकार्य केल्याचा आरोप करत रयतराज संघटनेचे पालिका युनिट अध्यक्ष गोविंद परब यांच्याच निलंबनाची मागणी प्रशासनाकडे लावून धरली.