भिवंडी : २१ दिवसांंच्या गणेशमूर्ती विसर्जित करून घरी परतताना कर्कश आवाज करून नाचणाऱ्या गणेशभक्तांना डीजे बंद करण्यास सांगितले असता, त्यांनी शिवीगाळ करून पोलीस निरीक्षकाचे पिस्तूल हिसकावले. ही घटना पिंपळघर येथे बुधवारी रात्री घडली.बळवंत पाटील, हितेश पाटील व साथीदारांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र अर्जुन हडळ यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बळवंत याला अटक केली आहे. गणेश पाटील यांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी हा प्रकार घडला. ध्वनिप्रदुषणाची तक्रार करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}