मीरा रोड - लग्नाचे वय उलटलेल्या आणि लग्न जमत नसलेल्या मुलांना हेरून त्यांना पैसे देऊन त्यांच्यासोबत थाटामाटात लग्न करायचे. त्यानंतर सासरी दोन दिवस राहून घरातील मौल्यवान दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारून चोर नवरी फरार व्हायची. २८ जानेवारी रोजी काशीमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घडली होती. याप्रकरणी काशीमीरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करून ‘डॉली की डोली’ टोळीचा पर्दाफाश करत त्यांना अहिल्यानगर येथून बेड्या ठोकल्या.
मीरा रोड पूर्वेच्या न्यू म्हाडा इमारतीमध्ये राहणारे सेवलकुमार नाडर (५३) यांना जुलै ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीदरम्यान आरोपींनी लग्नासाठी मुलगी आहे, असे सांगितले. फोटो पाठवून, चर्चा करून लग्न लावून देण्यासाठी बँकेच्या खात्यावर ४४ हजार ७५० रुपये रोख रक्कम घेतली व त्यानंतर २६ जानेवारीला लग्न केले. त्यानंतर आरोपी नवऱ्या मुलीने तक्रारदारांच्या घरातील ४ लाख ७६ हजारांचे दागिने व वस्तू चोरून नेल्या.
तब्बल पाच गुन्हे उघडवरी मुलगी नेहा अरुण खंडेलवाल ऊर्फ जन्नत (२२) आणि नकली बाप केसरीमल लक्ष्मीलाल रांका ( ४५) यांना १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपींनी या गुन्ह्याव्यतिरिक्त संगमनेर, जोगेश्वरी, बोरिवली मुंबई व पाचोरा (जिल्हा जळगाव) येथे अशा प्रकारचे पाच गुन्हे केल्याचे समोर आले.
...आणि अटक झालीया प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे करीत आहेत. आरोपी दुसरे लग्न करून फसवणूक करण्याच्या तयारीत असतानाच संगमनेर येथून त्यांना अटक केली, अशी माहिती उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली.
Web Summary : Police in Kashimira busted a gang dubbed 'Dolly ki Doli' for defrauding grooms. The gang would marry men, then steal valuables and flee. Five cases are solved, arrests made as suspects planned another wedding scam.
Web Summary : काशीमीरा पुलिस ने 'डॉली की डोली' नामक गिरोह का पर्दाफाश किया, जो दूल्हों को धोखा देता था। गिरोह शादी करता, फिर कीमती सामान चुराकर भाग जाता। पांच मामले सुलझे, संदिग्धों की एक और शादी घोटाले की योजना बनाते समय गिरफ्तारी हुई।