शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडासह दोघांना तलवारीसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 21:12 IST

वागळे इस्टेट हाजूरी भागात तलवारीसह धुमाकूळ घालीत दहशत पसरविणाऱ्या अनिकेत आमले ऊर्फ आन्या (३५) आणि त्याचा साथीदार विक्र म सिंग (२६) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून एक तलवारही ह्रस्तगत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांची कारवाई दहशत पसरविल्याचा व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला अनिकेत संजय आमले ऊर्फ आन्या (३५) आणि त्याचा साथीदार विक्र म अच्छेवार सिंग (२६, रा. आनंद पार्क, रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना तलवारीसह वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली.वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण हे २४ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट परिमंडळात रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी वागळे इस्टेट, हाजुरी सर्कल येथे काहीजण हत्यारांसहित फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. ती मिळाल्यानंतर आपल्या पथकासह पठाण हे घटनास्थळी गेले. तिथे अनिकेत आणि विक्रम या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. विक्रम याच्याकडून तलवार हस्तगत केली. त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह महाराष्ट्र कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याच्यासोबत असलेला गुंड अनिकेत याला वागळे इस्टेट पोलिसांनी २९ सप्टेंबर २०१८ रोजी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.* कारवाई करूनही काढली तलवारठाण्याच्या हाजुरी भागात राहणारा गुंड अनिकेत हा गेल्या दीड वर्षांपासून हद्दपार असूनही त्याची या भागात प्रचंड दहशत आहे. तो आपल्या साथीदारासह तलवार घेऊन फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.* इतरही गुंडांची दहशतहाजुरी भागात सोनू पाल आणि सचिन कान्या या दोन गुंडांनीही धुमाकूळ घातला आहे. तलवारीसारखे शस्त्र घेऊन ते या परिसरात दहशत माजवित असल्याचा मेसेज व्हायरल झाल्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. त्यांच्यावरही कारवाईची मागणी स्थानिक रहिवाशांनी वागळे इस्टेट पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या गुंडांवरही लवकरच कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस