लाच प्रकरणातील अधिकारी झाले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:33 PM2020-02-22T23:33:40+5:302020-02-22T23:33:56+5:30

पालिकेतील जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले, त्यांना वर्ष-दोन वर्षांनंतर सेवेत घेतले गेले. मात्र, त्यांना कामाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यात आले.

Bribery officer becomes exile | लाच प्रकरणातील अधिकारी झाले हद्दपार

लाच प्रकरणातील अधिकारी झाले हद्दपार

Next

- पंकज पाटील

अंबरनाथ आणि बदलापुरात लाच प्रकरणात जे कोणी अधिकारी अडकले, ते पुन्हा पालिकेत फिरकलेच नाही. त्यांची परस्पर बदली करण्यात आली. पालिकेतील जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले, त्यांना वर्ष-दोन वर्षांनंतर सेवेत घेतले गेले. मात्र, त्यांना कामाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यात आले.

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत सर्वात मोठा सापळा रचला गेला, तो मुख्याधिकारी राजेश कानडे असताना. राजेश कानडे हे पूर्वी अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी होते. त्यांची बदली करून त्यांना बदलापूरला पाठविण्यात आले. मात्र, काही बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांचे पटत नसल्याने त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचले गेले. त्यांचे निकटचे सहकारी दिनेश नेरकर हे नगररचना सहायकपदावर काम करीत होते. नेरकर यांनी एका प्रकरणात लाच स्वीकारून थेट मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले होते. त्यामुळे सापळ्यात मुख्याधिकारी कानडे आणि त्यांचे सहकारी नेरकर हे दोघे अडकले. याप्रकरणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना कानडे यांनी पुन्हा पालिकेत न फिरकण्याचा निर्णय घेतला. तर, नेरकर हे परजिल्ह्यात बदली करून निघून गेले. असाच प्रकार अंबरनाथमध्येदेखील घडला. पालिकेचे उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांची चौकशी झाल्यावर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नार्वेकर यांची शासनाने परजिल्ह्यातील नगर परिषदेत बदली केली. असाच एक प्रकार अंबरनाथच्या नगररचना विभागातही घडला. सहायक नगररचनाकार चव्हाण यांच्याविरोधात लाच प्रकरणात सापळा रचण्यात आला होता. मात्र, चव्हाण हे लाचलुचपत विभागाच्या हातावर तुरी देऊन तेथून पळून गेले. ते अधिकाºयांच्या हातात न सापडल्याने त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या. या प्रकरणानंतरही चव्हाण पुन्हा पालिकेच्या सेवेत रुजू होण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, राज्य शासनाने त्यांची दुसºया नगर परिषदेत बदली केली.

अधिकाºयांसह जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले आहेत, ते देखील मूळ प्रवाहाच्या बाहेरच राहिले आहेत. त्यांना पालिकेच्या मूळ आणि जबाबदारीच्या पदापासून दूर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Bribery officer becomes exile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.