शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये परसबाग कामांना वेग

By admin | Updated: May 26, 2014 04:34 IST

सध्याच्या काळात गगनाला भिडलेली महागाई, महिन्याआड पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये होणारी दरवाढ

पेण : सध्याच्या काळात गगनाला भिडलेली महागाई, महिन्याआड पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये होणारी दरवाढ, जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किंमती यामुळे घरखर्च चालविताना गृहिणींना काटकसर, पदरमोड करावी लागते. पूर्वीच्या काळात शेतकरी स्वंयपूर्ण होता. खाद्यतेल व मसाल्याचे पदार्थ वगळता धान्य, डाळी, कडधान्ये, भाजीपाला व फुले या सार्‍याचे कृषी उत्पादन घेण्याकडे शेतकरीवर्र्गाचा कल होता. १९९० च्या दशकापासून खेड्यांमध्ये आधुनिक जीवनशैलीचे वारे घुसले आणि स्वंयपूर्णतकडे झुकलेल्या ग्रामीण जीवनशैलीने आधुनिकीची झालर पांघरुन रेडिमेड तयार मंडईतील भाजीपाला खरेदी करण्याची कास धरली गेली. दोन दशकात महागाईने कंबरडे मोडल्यानंतर गड्या आपली घरची मिठभाकरी अन् चटणी बरी म्हणून आता पुन्हा घरच्या दारी परसबागातून भाजीपाला उत्पादन घेण्याची चाकोरी पुन्हा सुरु झाली आहे. शेती आणि शेतकरी हे प्रकृतीच सौंदर्य आणि आधार परंपरागत कृषीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास बरेच काही साध्य होत जगाचा व्यापार एकमेकांशी निगडीत झाल्याने सध्या बाजारात देशी आणि विदेशी हायब्रीड उत्पादन देणारी बियाणे कृषी विद्यापीठाकडून निर्माण केली आहेत. पेणमधील खारभूमीचा खारेपाट वगळता तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भात लागवड क्षेत्रामधील शेताचे बांध, डोंगरउतार, माळराने, यांचा चार हजार हेक्टर क्षेत्रावर नागली पीकासह, भाजीपाला व वेलवर्गीय भाज्यांचे उत्पादन शेतकरी घेतो. मात्र पेणच्या पुर्वेकडील भाग हा डोंगराळ व लालबुंद मातीचा असल्याने येथील परिसरताील घराची बांधणी प्रत्येक घराच्या लगत असलेली ऐसपैस जागा. या सुटसुटीत रचनेमुळे घरालगत असणार्‍या मोकळ्या जागेत परसबागा करण्याची पूर्वापार चालत आलेली कृषीपुरक परंपरा आता मोठ्या उमेदीने सुरु झाली आहे. पेणच्या विनोबा भावेंच्या जन्मगाव असलेल्या गागोदे गावात ग्रामदान मंडळ आहे. या गावातील ७० ते ७५ घरासमोरील व पाठीमागील जागेत परसबाग लावण्यात मोठा वाटा आहे. आंबेघर, सावसई, वाक्रुळ, कामार्ली, वरसई, जावळी, निधवली, पाबळ, जिते, खारपाले या ग्रा. पं. च्या परिसरातील क्षेत्रात परसबागेतून भाजीपाला उत्पादन घेण्याकडे गावकर्‍यांचा कल आहे. (वार्ताहर)