शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 18:23 IST

मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे.

नितीन पंडितभिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह पालिका प्रशासनाला यश आल्याने सध्या शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर आला आहे. मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्या नंतर केंद्र व राज्य सरकार ने विविध उपाययोजना करीत आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या सोबत स्थलांतरीत मजुरांची भूक भागविण्या पासून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्या पर्यंत अनेक सोपस्कर अवलंबिले परंतु भिवंडी शहर व ग्रामीण भागात उपाय योजना करण्यातस एप्रिल महिन्यात प्रशासन अपयशी ठरल्याने जून महिन्यात परीसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असतानाच मृत्यूचे प्रमाण ही वाढले होत परंतु जुलै मध्ये आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी पदभार स्वीकारल्या नंतर व नव्या आयुक्तांनी रावबिलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात दिसून आला . त्यामुळे आज शहरातील अनेक खासगी कोविड रुग्णालयात बेड रिकामे होत आहेत. त्याच बरोबर रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ही कमी झाले असून शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.तर ग्रामीण भागातील रुग्णांची सुरवाती पासून रुग्णालय दाखल होण्या पासून उपचार मिळविण्यासाठी येथील रुग्णांना झगडावे लागले परंतु आज ही जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात आज ही यशस्वी झाले नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारली नाही.  येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात 300 बेड चे कोविड सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे 200 तर काल्हेर येथे 100 बेड सह सवाद येथे 700 बेड चे कोव्हिडं केअर सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हिच कोविड सेंटर आधीपासूनच सुरु केली असती तर रुग्णांची कोरोना मुळे झालेली वाताहत थांबविता आली असती.दरम्यान शहरातील रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून रुग्ण दुपट्टीचा कालावधी 65 दिवसांवर पोहचला तर शहरातील मृत्यु दर 5. 44  % तर ग्रामीण भागात मृत्यु दर 3.12 % आहे . दरम्यान " जून महिन्यात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी जुलै महिन्यात मिळाली असल्याने जुलै महिन्यात मृत्यूंच्या आकडेवारीत वाढ दिसत आहे. मात्र जुलै पासून कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात व मृत्यू दर कमी करण्यात मनपासह आरोग्य यंत्रणेला नक्कीच यश आले आहे अशी प्रतिक्रिया मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोकाशी यांनी दिली आहे.