शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांच्या प्रचाराने पक्ष धास्तावले

By admin | Updated: October 28, 2015 00:51 IST

कल्याण (पूर्व) मध्ये मातब्बर राजकीय पक्षांच्या बरोबर अपक्षांनीही प्रचारात आघाडी घेतली असल्यामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार धास्तावले आहेत.

दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी कल्याण (पूर्व) मध्ये मातब्बर राजकीय पक्षांच्या बरोबर अपक्षांनीही प्रचारात आघाडी घेतली असल्यामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार धास्तावले आहेत.कल्याण (पूर्व) मध्ये राजकीय पक्षांतून अनेक प्रभागांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे बंडाळी झाली आहे, ते सर्व अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत असून सर्व शक्तीनीशी मैदानात उतरले आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये १० ते १५ अपक्ष उमेदवार तेथील मातब्बर राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आव्हान देण्यासाठी उभे आहेत. त्यांना हेही माहिती आहे की, धनाढ्य उमेदवारांच्या स्पर्धेत आपण टिकू शकत नाही. परंतु २०० ते ५०० मते आपण खाऊ शकतो आणि अशा प्रकारे सर्वच अपक्षांनी मते मिळवली तर विजयाचे गणित बदलू शकते, हेच त्यांना हवे आहे. तर काही अपक्ष आपल्या विजयाची तोरणे बांधण्याच्या तयारीत आहेत. याचे कारण मातब्बर राजकीय पक्षांमध्येसुद्धा सुंदोपसुंदी सुरु आहे.अनेक प्रभागांची भ्रमंती केली असता मातब्बर राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारफेरीतून संपूर्ण प्रभागात हवा निर्माण केली आहे. परंतु मतदार सुज्ञ आहे, तो गेल्या वेळच्या लोकप्रतिनिधीने काय कामगिरी केली आहे, हे तो जाणून आहे आणि अनेकांशी चर्चा केली असता त्यांनी मतदान कोणाला करायचे हे ठरवले आहे. काहींनी असे म्हटले की या निवडणुकीने शेकडो युवकांचा, महिलांचा रोजगार मिळवून दिला आहे. काहीच्या प्रचारफेरीमध्ये गर्भवती कमरेवर लहान मुले व चालताना ज्यांना कष्ट होत होते, अशा वयोवृद्ध महिला सहभागी होत्या, हे दृष्य लाजीरवाणे होते. अनेक प्रभागातील प्रचारफेरीमध्ये दुसऱ्या प्रभागातील महिलांना नाईलाजाने सहभागी करून घेण्यात आल्याचे पक्षीय कार्यकर्त्यांनीच सांगितले.कल्याण-डोंबिवली महापालिकेची सत्ता शिवसेनेकडून खेचून घ्यायचीच, असा चंग भाजपाने केल्यामुळे शिवसेनाही पेटून उठली असल्याचे दृष्य दिसत आहे. नुकत्याच झालेल्या राज ठाकरेंच्या सभेमुळे मनसेच्या उमेदवारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. आचार संहितेची बंधने असूनही अतिशय चालाखीने सर्वांचा निवडणूक प्रचार सुरु आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या आदल्या रात्री आणि निवडणुकीच्या दिवशी ज्यांना विजयाची खात्री वाटते ते सर्व उमेदवार मतांच्या बेगमीसाठी सर्वतोपरी मार्ग अवलंबणार असून हसतखेळत एकमेकांना सहकार्य केले जाणार आहे. प्रसंगी खटके उडाले तरी खेळीमेळीने वाद मिटविले जाणार आहेत. फारच कमी ठिकाणी संघर्ष होणार आहे. लोकशाहीच्या नावाखाली उघड्या डोळ्यांनी तमाशा बघावा लागणार आहे. कमकुवत उमेदवार हे ची फल काय मम तपाला असे म्हणत डोळे मिटून घेणार आहे.