खुल्या बचत गटांचीही नोंद होणार

By Admin | Updated: March 22, 2016 02:06 IST2016-03-22T02:06:55+5:302016-03-22T02:06:55+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत विविध संवर्गांतील महिला बचत गटांची नोंदणी झाली आहे. येत्या काही महिन्यांत खुल्या महिला बचत गटांची नोंदणी केली जाईल

Open saving groups will also be registered | खुल्या बचत गटांचीही नोंद होणार

खुल्या बचत गटांचीही नोंद होणार

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत विविध संवर्गांतील महिला बचत गटांची नोंदणी झाली आहे. येत्या काही महिन्यांत खुल्या महिला बचत गटांची नोंदणी केली जाईल, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.
महापालिकेच्या महिला-बालकल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी अत्रे रंगमंदिरात कार्यक्रम झाला. या प्रसंगी समितीच्या सभापती सुशीला माळी, शिवसेना गटनेते रमेश जाधव, मनसे गटनेते मंंदार हळबे, सहायक आयुक्त संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. त्या वेळी देवळेकर बोलत होते. माळी म्हणाले, महिलांसाठीच्या योजनांचा लाभ समितीच्या माध्यमातून दिला जाईल. पालिका क्षेत्रातील कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्नेहल कांबळे, पल्लवी घुडे, पल्लवी नगरकर, मंदाकिनी भावे, गायक्षी प्रभुघाटे, सुजाता परांजपे, शैलजा पाटील, मंदा निखारे, कल्पना हर्डीकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. मूक व कर्णबधिर असलेल्या सुनंदा लाड यांनाही गौरवण्यात आले. सभापतींचा एक महिन्याचा भत्ता लाड यांना दिला जाईल, असे या वेळी जाहीर करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महिलांसाठी ‘सेल्फी’ नाटकाचा प्रयोग झाला.

Web Title: Open saving groups will also be registered