शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

देशात ५० हजार वनस्पतींपैकी केवळ पाच हजाराची नोंद - सोनल पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 06:26 IST

जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे.

अंबरनाथ - जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. आपल्याकडची पारंपारिक वनौषधी बहुगुणी असली तरी जागतिक स्तरावर त्या औषधांचा फारसा प्रसार झालेला नाही.आयुर्वेदिक औषधे आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवू शकली नाहीत. नवनव्या विज्ञान विषय शाखा निवडून देशातील तरु णांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे, अस मत सोनल आयकर-पाटणकर यांनी व्यक्त केले. येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते.सरत्या वर्षाच्या अखेरच्या रविवारी मराठी विज्ञान परिषदेने बदलापूर येथील तरूण संशोधक डॉ. सौरभ पाटणकर आणि सोनल आयकर-पाटणकर या दाम्पत्याचे व्याख्यान झाले. जैविक वनस्पतीजन्य पदार्थांपासून अतिसूक्ष्म काष्ठशिल्प बनवण्यात यशस्वी ठरलेल्या प्रयोगाविषयी डॉ. पाटणकर यांनी उपस्थितांना माहिती दिली. सध्या पेट्रोलजन्य इंधनामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्याला पर्याय ठरणाºया पर्यावरणस्नेही इंधनांचा सध्या शोध सुरू आहे.अतिसूक्ष्म तंत्रज्ञान शाखेत (नॅनो-टेक्नॉलॉजी) पर्यावरणस्नेही पद्धतीने प्रक्रि या करून जैविक घटकांपासून उर्जा मिळवण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात जैविक कचरा बनतो. त्यापासून उर्जा मिळवली तर ती किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही ठरेल. तसेच त्यामुळे देश स्वयंपूर्ण होईल, असेही सौरभने सांगितले. जैविक घटकांपासून पर्यावरणस्नेही पद्धतीने बनविलेले अतिसूक्ष्म काष्ठशिल्प वैद्यकीय साधने बनवण्यात उपयोगी ठरतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली.सोनल आयकर-पाटणकर मानवनिार्मित जीवशास्त्र विषयात कॅनडामध्ये पीएच.डी करीत आहेत. त्यांनी तुलनेने नवीन असणाºया या विषय शाखेची ओळख करून दिली. तसेच सध्याच्या काळातील तिच्या उपयुक्ततेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कॅनडामध्ये संशोधक म्हणून कार्यरत असलेले सौरभ आणि सोनल मागील आठवडयात भारतात होते. त्यादरम्यान त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, याहेतूने मराठी विज्ञान परिषदेने त्यांचे व्याख्यान ठेवले.हे अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी अंबरनाथमधील रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.विज्ञानप्रेमींची गर्दी : आधुनिक विज्ञानातील हे पर्यावरणस्नेही संशोधन देशासाठी उपयोगात आणण्याचा मनोदयही दोघांनी व्यक्त केला. समारंभादरम्यान मराठी विज्ञान परिषदेच्या अंबरनाथ विभागाचे अध्यक्ष प्रा. भगवान चक्र देव यांच्या हस्ते सौरभ आणि सोनल यांचा सत्कार करण्यात आला. अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरांमधील विज्ञानप्रेमी या कार्यक्र माला मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगलIndiaभारत