शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वृद्धेची सोनसाखळी खेचून पळालेला चोरटा अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 23:24 IST

नौपाडा भागात पुन्हा सोनसाखळी चोरटयांनी डोके वर काढले असतांनाच एका वृद्धेची सोनसाखळी खेचून पळालेल्या अजुद्दीन सिराज शेख (३७) या सराईत चोरट्याला नौपाडा पोलिसांनी वांगणी येथून नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून जबरी चोरीतील सुमारे २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळीसह एक लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाई एक लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्तवांगणी येथून केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वृद्धेची सोनसाखळी खेचून पळालेल्या अजुद्दीन सिराज शेख (३७) या सराईत चोरट्याला नौपाडा पोलिसांनी वांगणी (ता. अंबरनाथ) येथून नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून जबरी चोरीतील सुमारे २७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि एक मोटारसायकल असा एक लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ठाण्याच्या चरई परिसरात राहणारी संबंधित ७२ वर्षीय तक्रारदार महिला ही ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी नातवास क्लासवरून घेऊन येत होती. त्यावेळी चरईतील ‘संदीप अपार्टमेंट’समोरील रस्त्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केला होता. याप्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हाही दाखल केला होता. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सोनसाखळीची जबरी चोरी करणाऱ्यांपैकी मोटारसायकलचा चालक अजुद्दीन याला २९ सप्टेंबर २०१९ रोजी वांगणी परिसरातून ताब्यात घेतले. सोनसाखळी जबरी चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला अटक केली. त्याला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.*साथीदाराचा शोध सुरूजबरी चोरीतील ८० हजारांची सोनसाखळी आणि त्या चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एक लाख २० हजारांचा ऐवज त्याच्याकडून जप्त केला आहे. त्याच्या फरारी साथीदाराचाही शोध घेण्यात येत असून त्याने आणखी कोणत्या परिसरात असे सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे केले, याचाही सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक