शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासी डाटा तयार करण्यासाठी लक्षवेधी मोहीम

By admin | Updated: December 8, 2015 00:26 IST

प्रवाशांची वाढती संख्या व अपुरया असलेल्या रेल्वे गाड्या यांचा समतोल साधला जात नसल्याने उपनगरीय रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व जीवघेणा होत चालला आहे

मुरलीधर भवार,  डोंबिवलीप्रवाशांची वाढती संख्या व अपुरया असलेल्या रेल्वे गाड्या यांचा समतोल साधला जात नसल्याने उपनगरीय रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व जीवघेणा होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने उपनगरीय प्रवासी डाटा तयार करण्यासाठी डोंबिवलीत जागरुक नागरीक राजन मुकादम यांनी दोन दिवस स्टेशन परिसरात मोहिम राबविली. पाच रुपये द्या आणि रेल्वे मंत्र्यांना सूचना करा असे या मोहिमेचे स्वरुप होते. मोहिम लहान स्वरुपातअसली तरी ती महत्वाची आहे. त्यातून आलेल्या सूचना रेल्वे मंत्र्यांसह कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन यांच्याकडे सादर केल्या जाणार आहे.मुकामद यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात रामनगर तिकीट खिडकीजवळ शुक्रवा व शनिवार या दोन दिवसात प्रवासी जन हो या आशयाचेआवहन करुन पाच रुपये द्या आणि रेल्वे मंत्र्यांना सूचना करा असे आवाहन केले होते. दोन दिवसात तब्बल ४८० प्रवासांनी पाच रुपये देऊन त्यांनी दिलेला फॉर्म भरला आहे. या फॉर्मवर प्रवासी पुरुष की महिला, प्रवासाचे ठिकाण, प्रवासी वेळ तास मिनिटांसह, नाव, पत्ता, गाडीच्या कोणत्या डब्यातून प्रवास करता, कामाचे ठिकाण कोणते या संदर्भात प्रश्न विचारुन ते भरुन घेतले आहेत. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेवर रेल्वे प्रशासन कधी शटल सेवा सुरु करतात. तर कधी ही सेवा प्रवाशांना न सांगताच बंद केली जाते. रेल्वेचा मनमानी कारभार हा प्रवाशांना सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे पॅसेंजरचा डाटा आहे. तो डाटा हा उपनगरीय मध् य व पश्चिम रेल्वेसाठी लागू करुन चालणार नाही. इंडियन पॅसेंजर डाटातून मध्य व पश्चिम रेल्वे प्रवासांचा डाटा वगळून नव्याने तो करण्यात यावा. यामागील प्रमुख उद्देश असा आहे याविषयी माहिती देताना मुकादम यांनी सांगितले की, रेल्वेने प्रवास करणारे पुरुष व महिला प्रवासी किती आहे.सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्रीच्या वेळी उपनगरीय गाड्यावर प्रवाशांचा किती लोड आहे. काही प्रवासी डोंबिवली दादर प्रवास करतात. ते महिन्याचा रेल्वे प्रवास पास हा डोंबिवली मुंबई असा काढता. कारण त्यांना गर्दीच्या वेळी गाडी मुंबई स्थानकात पकडणे सोयीचे वाटते. दादर स्थानकातून गाडी पकडत नाहीत. ठाणे डोंबिवली व डोंबिवली घाटकोपर या प्रवासाचे प्रवासी भाडे एकच आहे. त्यामुळे प्रवासी हा घाटकोपरपर्यंत प्रवास करणारा आहे अशी नोंद रेल्वेच्याकडे होते.प्रवाशांनी सूचविलेल्या सूचनांची एक प्रत उद्या सोमवारी आयुक्तांकडे सादर केली जाणार आहे. तर मूळ प्रत ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर केली जाणार आहे असे मुकादम यांनी सांगितले.