शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गावांना मिळणार मालमत्ताकरात दिलासा, केडीएमसीच्या महासभेत मांडणार प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 02:05 IST

Shrikant Shinde News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या ९ गावांच्या मालमत्ता कराबाबत डॉ. सूर्यवंशी यांच्याशी डॉ. शिंदे यांनी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे सदानंद थरवळ, दीपेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे, रूपाली म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नऊ गावांतील मालमत्ताधारकांना आकारण्यात येणारा कर कमी करण्यात येणार आहे. त्याविषयी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला आहे. लवकरच हा प्रस्ताव महासभेत सादर करून मंजूर केला जाणार आहे. त्यामुळे नऊ गावांतील नागरिकांना मालमत्ताकराच्या वाढीपासून दिलासा मिळणार आहे, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी सोमवारी दिली.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या ९ गावांच्या मालमत्ता कराबाबत डॉ. सूर्यवंशी यांच्याशी डॉ. शिंदे यांनी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे सदानंद थरवळ, दीपेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे, रूपाली म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.२७ गावे १९८३ पासून केडीएमसीत होती. २००२ मध्ये ती मनपातून वगळण्यात आली. पुन्हा ही गावे २०१५ मध्ये मनपात समाविष्ट केली गेली. आता त्यापैकी १८ गावे मनपातून वगळण्यात आली आहेत. मात्र, नऊ गावे महापालिकेत असून, तेथील नागरिकांकडून अडीचपट जास्तीचा मालमत्ताकर आकारला जात आहे. त्यात सूट मिळावी, अशी तेथील नागरिकांची मागणी होती. नऊ गावांतील २००२ पर्यंत असलेल्या मालमत्ताधारकांना जास्तीचा कर लावला जाणार नाही. त्याचबरोबर २००२ ते २०१५ या कालावधीत ही गावे ज्या नियोजन प्राधिकरणांतर्गत होती, त्यांना त्या मालमत्ताधारकांनाही अडीचपट मालमत्ताकर आकारला जाऊ नये, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. या दोन्ही मागण्या आयुक्तांनी मान्य केल्या आहेत.येत्या महासभेत हा ठराव मांडला जाईल. महासभेच्या मान्यतेनंतर ही सूट नऊ गावांतील मालमत्ताधारकांना मिळणार आहे. लवकरच महासभा होणार असून, त्यात ठराव मंजूर झाल्यावर सध्या मनपाकडून सुरू असलेली अभय योजनेचा लाभही मालमत्ताधारकांना घेता येणार आहे. नऊ गावांतील मालमत्ताधारकांचा यामुळे दुहेरी फायदा होणार आहे.रस्त्याच्या खर्चाची विभागणीडोंबिवली एमआयडीसी परिसरातील रस्त्यासाठी महापालिका व एमआयडीसीने प्रत्येकी ५५ टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले आहे. एकूण खर्च ११० कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी ५५ कोटी महापालिका व ५५ कोटी एमआयडीसी खर्च करणार असल्याची माहितीही डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShrikant Shindeश्रीकांत शिंदे