जिवंत काडतुसासह देशी कट्टा जप्त

By Admin | Updated: May 13, 2017 00:43 IST2017-05-13T00:43:06+5:302017-05-13T00:43:06+5:30

उत्तर प्रदेशच्या एका युवकाजवळून जिवंत काडतुसासह देशी कट्टा वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी ठाण्यातून जप्त केला. आरोपीला

A native carton with live cartridge seized | जिवंत काडतुसासह देशी कट्टा जप्त

जिवंत काडतुसासह देशी कट्टा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उत्तर प्रदेशच्या एका युवकाजवळून जिवंत काडतुसासह देशी कट्टा वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी ठाण्यातून जप्त केला. आरोपीला न्यायालयाने १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वागळे इस्टेट भागातील कामगार हॉस्पिटल परिसरात गुरुवारी सायंकाळी देशी कट्टा विक्रीसाठी आरोपी येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक व्ही.के. बाबर आणि त्यांच्या पथकाने या भागात सापळा रचत त्याला अटक केली.

Web Title: A native carton with live cartridge seized