शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम व्यापाऱ्याने दिला नगरच्या शेतकऱ्याला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:49 IST

भिवंडीत रमजानसाठी आणलेल्या १० टन कलिंगडांची खरेदी  

 नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : रमजाननिमित्त तयार केलेली विशिष्ट जातीची कलिंगडे घेऊन विक्रीसाठी अहमदनगर येथील तरुण व प्रगतिशील शेतकरी भिवंडीत आला होता. चार ते पाच दिवस उलटूनही त्याच्याकडील कलिंगडाची विक्री न झाल्याने त्याची मेहनत वाया जाऊ नये म्हणून दहा टन कलिंगड चढ्या भावाने विकत घेऊन होतकरू शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न भिवंडीतील मुस्लिम व्यापाऱ्याने केला आहे. ही कलिंगडे खरेदी करून   शेतकऱ्याला मदत करतानाच रमजान सणात हिंदू-मुस्लीम एकात्मतेची प्रचितीही दिली आहे.अहमदनगर येथील प्रगतिशील शेतकरी सूरज भालसिंग यांनी दीड एकर शेतात सात ते आठ हजार कलिंगडांची रोपे लावून पीक घेतले आहे.  ही सर्व कलिंगडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविली जाणारी आहेत. आरोही आणि विशाल अशा दोन जातींची ही कलिंगडे आहेत. आरोही जातीचे कलिंगड हे वरून हिरवे, तर कापल्यानंतर पिवळे तर विशाल जातीचे कलिंगड हे वरून पिवळे तर कापल्यानंतर लाल दिसते.   लॉकडाऊनमुळे कलिंगड विकायची कशी आणि कुठे या चिंतेत तो होता. रमजान महिना असल्याने भिवंडीसारख्या शहरात त्याने ही कलिंगडे अहमदनगर येथून ट्रकमधून आणली. भिवंडीतील व्यावसायिक वाहिद खान यांनी या शेतकऱ्यांची विचारपूस केली. सूरज याने शेतीत नवा प्रयोग म्हणून नव्या जातीचे पीक घेतले हाेते. खान यांनी त्याच्याकडील सर्व दहा टन कलिंगड खरेदी केली. सूरज यांना ९० ते ९५ हजार भाव  अपेक्षित असताना खान यांनी दोन लाखाहून अधिक रक्कम देऊन खरेदी केली.

गरीब, पोलीस कर्मचाऱ्यांना देणार मोफत लॉकडाऊनमुळे त्याच्या मालाची विक्री होत नसल्याने मी सर्व कलिंगड खरेदी केली. माझ्या या छोट्याशा मदतीने त्याच्या चेहऱ्यावर हसू आले यातच मला समाधान मिळाले. तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी माझा हा प्रयत्न आहे. सध्या पवित्र रमजान सण सुरू आहे, त्यातच कोरोनामुळे शहरात पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे ही सर्व कलिंगड मी गरीब गरजूंना व पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत वाटप करणार अशी प्रतिक्रिया व्यावसायिक वाहिद खान यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या