शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदलेल्या ‘देवा भाई’मुळे फुटली खुनाला वाचा; प्रेमाच्या ‘त्रिकोणा’तून केले कृत्य

By जितेंद्र कालेकर | Updated: May 15, 2025 06:17 IST

प्रेमाच्या अनैतिक त्रिकाेणी संबंधातून एका महिलेच्या इशाऱ्यावरुन पहिल्या प्रियकराने खून केल्याची माहिती समोर आल्यानंंतर महिलेसह तिघांना ‘एलसीबी’ने अटक केली. 

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गालगत मिळालेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले. पोलिस पाटलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील व्हायरल मेसेज आणि मृताच्या हातावर गोंदलेल्या ‘देवा भाई’ नावाने या खुनाला वाचा फुटली. प्रेमाच्या अनैतिक त्रिकाेणी संबंधातून एका महिलेच्या इशाऱ्यावरुन पहिल्या प्रियकराने खून केल्याची माहिती समोर आल्यानंंतर महिलेसह तिघांना ‘एलसीबी’ने अटक केली. 

मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत ३० वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह शहापूरच्या उंबरखांड गावाजवळ टाकल्याचा प्रकार ३० एप्रिल रोजी सकाळी समोर आला. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाेलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी हे प्रकरण समांतर तपासासाठी ‘एलसीबी’कडे सोपविले. ‘एलसीबी’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे आणि शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी तपासासाठी पथके तयार केली.

‘तिच्या’च साठी केला खून

सिन्नरमधील महिलेचे अशोकबरोबर ‘संबंध’ होते. वर्षभरानंतर तिने त्याला सोडले. पुढे वसीम या पहिल्या प्रियकराच्या ती संपर्कात आली. याच प्रेमाच्या ‘त्रिकोणा’तून वाद झाले.  त्यानंतर महिलेच्या इशाऱ्यावरून वसीम व राहुल यांनी अशोकचा खून करून मृतदेह मुंबई- नाशिक महामार्गालगत टाकल्याचे तपास उघड झाले.

गोंदलेल्या नावाने पटली ओळख 

मृतदेहाच्या डाव्या हातावर ४९१-देवा भाई, उजव्या हातावर इंग्रजीत एका मुलीचे नाव तर हाताच्या तळव्याच्या पाठीमागे ‘ए’ असे इंग्रजीत गोंदलेले होते. त्याच्या गळ्यात ताईत असल्याची माहिती व्हॉट्सॲप मेसेजद्वारे व्हायरल झाली. त्यानंतर हा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अशोक मधेचा असल्याची माहिती एका पोलिस पाटलाकडून मिळाली. त्यानंतर ‘एलसीबी’चे उपनिरीक्षक महेश कदम आणि शहापूरचे उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे यांनी संबंधित गावात जाऊन तपास केला. अशोक हा त्याच गावातील वसीम पठाण याच्याबरोबर गेल्याची माहिती मिळाली. वसीमला ताब्यात घेतल्यानंतर राहुल गुंजाळ या साथीदाराच्या मदतीने अशोकचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर गुंजाळलाही पोलिसांनी १० मे रोजी अटक केली.

सोशल मीडियाचा वापर

दोन्ही पथकांनी घटनास्थळापासूनच्या अनेक सीसीटीव्हींची पडताळणी केली. राज्यभरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिस ठाण्यांमधून काढली. मृतदेहाच्या फोटोचे स्टीकर बनवून ठिकठिकाणी माहिती प्रसिद्ध केली. राज्यातील पोलिस पाटलांसह  विविध व्हॉट्सॲप ग्रुपवरही माहिती दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी