पालिकेची स्वच्छतागृहे बनली मद्यपी, गर्दुल्यांचा अड्डे

By Admin | Updated: May 16, 2017 00:05 IST2017-05-16T00:05:25+5:302017-05-16T00:05:25+5:30

भार्इंदरच्या सरस्वतीनगरमागील पालिकेच्या सचिन तेंडुलकर मैदानातील सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे ही स्वच्छतागृहे मद्यपींचा अड्डाच बनली आहेत

Municipal corporation's sanitary latrines become alcoholic, garlands' base | पालिकेची स्वच्छतागृहे बनली मद्यपी, गर्दुल्यांचा अड्डे

पालिकेची स्वच्छतागृहे बनली मद्यपी, गर्दुल्यांचा अड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भार्इंदरच्या सरस्वतीनगरमागील पालिकेच्या सचिन तेंडुलकर मैदानातील सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे ही स्वच्छतागृहे मद्यपींचा अड्डाच बनली आहेत. स्वच्छतागृहास त्वरित वीज व पाणीजोडणी देऊन त्याची दुरुस्ती व नियमित साफसफाई करण्याची मागणी खेळाडू व नागरिकांनी केली आहे.
नवघर मार्गावरील सरस्वतीनगरमागे पालिकेने सुभाषचंद्र बोस मैदान विकसित केले आहे. या ठिकाणी खेळण्यासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह पालिकेने बांधले.
परंतु, स्वच्छतागृहास वीज व पाणीपुरवठाच पालिकेने केला नाही. शिवाय, त्याची दररोज साफसफाई केली जात नाही.
यामुळे स्वच्छतागृहाचा उपयोगच खेळाडू वा नागरिकांना होत नाही. नाइलाजास्तव येथील झुडुपात लघुशंकेसाठी जावे लागते. तर, स्वच्छतागृह हे धूम्रपान तसेच मद्यपींचा अड्डाच बनले आहे. शिवाय, अश्लील चाळे करण्यासाठी हे आंदण मिळाल्यासारखे आहे. पालिकेने काही लाख रुपये खर्च करून बांधलेले हे स्वच्छतागृह बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे गैरसोयीचे ठरले आहे.

Web Title: Municipal corporation's sanitary latrines become alcoholic, garlands' base