शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका तिजोऱ्यांत नोटांचा पाऊस

By admin | Updated: November 12, 2016 06:30 IST

महापालिकांचा मालमत्ताकर व पाणीपट्टी थकवण्याकडेच बहुतांश धनाढ्यांचा कल असतो. मात्र, बड्या रकमेच्या नोटा सरकारने रद्द केल्यावर महापालिका कार्यालयात कर

ठाणे : महापालिकांचा मालमत्ताकर व पाणीपट्टी थकवण्याकडेच बहुतांश धनाढ्यांचा कल असतो. मात्र, बड्या रकमेच्या नोटा सरकारने रद्द केल्यावर महापालिका कार्यालयात कर व कराची थकबाकी भरण्याकरिता या नोटा वापरता येतील, हे कळताच अनेकांनी रांगा लावून कर भरला.थकबाकीदारांना नोटिसा बजावून, कोर्टात दावे दाखल करून, घरासमोर बॅण्डबाजा वाजवून किंवा अगदी तृतीयपंथीयांना धांगडधिंगा करायला भाग पाडूनही जी करवसुली होत नव्हती, ती जादूची कांडी फिरल्यासारखी नोटा रद्द झाल्यामुळे झाल्याने महापालिकांच्या तिजोऱ्यांत बख्खळ भर पडली. केडीएमसीच्या तिजोरीत १४ कोटी? कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत शुक्रवारी रात्री ८.१५ वाजेपर्यंत ९ कोटी १७ लाख ५१ हजार ९०० रुपयांची भर मालमत्ता करवसुलीमुळे पडली. रात्रीपर्यंत आणखी किमान ६ कोटी रुपयांची वसुली अपेक्षित आहे. केडीएमसीने करवसुलीकरिता मोहीम सुरू केली होती व थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याचा बडगा उगारला असतानाच नोटा रद्द करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. दुपारी ३ पर्यंत एकूण ५ कोटी ८६ लाख ३६ हजार २५७ रुपये करापोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. कल्याणमधील ५ केंद्रांवर ३ सर्वाधिक १ कोटी २३ लाख ४१५ रुपये इतका कर हा डोंबिवलीतील ‘ह’ प्रभागात, तर त्याखालोखाल १ कोटी १४ लाख ५६ हजार ५५ रुपये कर कल्याणमधील ‘ब’ प्रभागात जमा झाला.ठामपाला साडेतेरा कोटींची कमाईठाणे : गुरुवारपासून शुक्रवार सायंकाळपर्यंत अवघ्या २४ तासांत मालमत्ता, पाणीपट्टी, जाहिरात आणि एलबीटीपोटी तब्बल १३.५० कोटींहून अधिकची वसुली झाली आहे. ठाणे महापालिकेने १० प्रभाग समित्यांमधील पाणीपट्टी व मालमत्ताकर वसुलीचे दोन्ही विभाग सुरू ठेवले. पाणीपट्टीची १.५० कोटीहून अधिक, तर मालमत्ताकराची ४.५० कोटींहून अधिकची वसुली झाली. जाहिरात करापोटी ४६ लाखांची विक्रमी वसुली झाली आहे. वसुली करण्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अतिरिक्त काउंटर सुरू केले व महापालिका मुख्यालयातील स्टाफही नियुक्त केला होता. उल्हासनगरात ८ कोटी वसुलीचा विक्रमउल्हासनगर : करवसुलीबाबतीत नेहमीच पिछाडीवर असलेल्या व तृतीयपंथीयांना घरासमोर धांगडधिंगा करायला लावून करवसुली करण्याचा टोकाचा निर्णय घेण्याची पाळी आलेल्या यामहापालिकेने गेल्या दोन दिवसांत ८ कोटींची करवसुली केली. मध्यरात्रीपर्यंत १० कोटींपर्यंत वसुली जाईल, अशी अपेक्षा आहे. उल्हासनगर महापालिकेची मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी ३६० कोटी रुपये आहे. करवसुलीकरिता स्थापन केलेल्या विशेष पथकाने एका महिन्यात २५० मालमत्ता जप्त केल्या असून ३९ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यापूर्वी मालमत्ताकर विभागाने महिला बचत गटाची मदत घेण्यापासून थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवून वसुली केली होती.