शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वीजमीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो तीन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : वीजमीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. महावितरणच्या तपासणीवेळी ...

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : वीजमीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. महावितरणच्या तपासणीवेळी अशी वीजचोरी उघडकीस आल्यास जबर दंड वसूल केला जातो. किंवा तीन वर्षे कारावासाची शिक्षाही होऊ शकते. कायद्यात तशी तरतूद असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

कल्याण परिमंडळात एप्रिल २०१९ ते मार्च २०२० यावर्षी ९०० ठिकाणी १७ लाख ४२ हजार युनिट विजेची चोरी आढळली, त्यातून दोन कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर एप्रिल २०२० ते मार्च २०२१ मध्ये एक हजार ६८९ ठिकाणी वीजमीटरमध्ये फेरफार करून २३ लाख ८२ हजार युनिट विजेची चोरी आढळली. त्यातून तीन कोटी ३० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत वीजमीटरमध्ये फेरफार करून विविध कल्पनांद्वारे १०४ ठिकाणी दोन लाख सात हजार युनिट विजेची चोरी आढळली. त्यातून ३४ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वीज कायदा कलम १३५ नुसार ही कारवाई केल्याची माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

--------------

कशी केली जाते वीज चोरी

मीटरमध्ये फेरफार करून मीटरमध्ये गती कमी करणे, रिमोटच्या साह्याने मीटर बंद करणे, मीटर बायपास करणे, मीटर असतानाही आकडा टाकून वीजचोरी करणे अशा प्रकारे वीजचोरी केली जाते.

--------------------

वीज वापराचे होते विश्लेषण

महावितरण सर्व ग्राहकांच्या मासिक वीजवापराचे नियमित विश्लेषण करीत असते. यात काही ग्राहकांचा वीजवापर कमी झाल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांचा वीजवापर खरोखर कमी झाला आहे की काही फेरफार केला याची पडताळणी महावितरणकडून केली जाते. यासाठी मोहीम राबवून वीजचोरांवर धडक कारवाई केली जाते.

-------------------

प्रयोगशाळेत होते मीटरचे टेस्टिंग

-

वीज चोरीचा संशय असलेले मीटर ताब्यात घेऊन त्याची महावितरणच्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी केली जाते. त्यात काही फेरफार केल्याचे आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीजचोरीचे अनुमानित बिल दिले जाते. तसेच चोरून वीज वापरल्याबद्दल दंड (कम्पाउंडिंग चार्जेस) आकारला जातो.

- वीजचोरीचे अनुमानित बिल व दंडाची रक्कम भरण्यासाठी ग्राहकाला मुदत दिली जाते. तथापि, निर्धारित मुदतीत ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर विद्युत २००३ मधील तरतुदीनुसार पोलिसांत फिर्याद देण्यात येते. या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल होतो. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा जबर दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

----------------------

वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, या गुन्ह्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. वीजमीटरमध्ये फेरफार करू नका. अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

- विजयसिंह दूधभाते, जनसंपर्क अधिकारी, कल्याण विभाग, महावितरण