शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मनसे स्वबळावर लढणार

By admin | Updated: March 29, 2017 05:33 IST

भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरीही पक्ष पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

रोहिदास पाटील /अनगाव भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरीही पक्ष पातळीवर जोरदार हालचाली  सुरू झाल्या आहेत. भाजपा तसेच काँग्रेस, समाजवादी पक्ष  बांधत असलेली आघाडीची मोट तर दुसरीकडे शिवसेनेने या आघाडीत न जाता स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेनेही स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार केला आहे. पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार हा पक्षाचा अजेंडा असेल, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळ््या पक्षांची तयारी सध्या सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झालेला नसल्याने थेट घडामोडींना वेग आलेला नाही. मात्र पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांची वर्दळ सुरू झाली आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या समर्थकांसह ठिकठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी दोन प्रभागांचा एक प्रभाग होता. यावर्षी चार प्रभागांचा एक प्रभाग यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सध्या महापालिकेत मनसेचा एकही सदस्य नसला तरी या निवडणुकीत सर्व जागा लढवणार असून, त्यामध्ये यश मिळेल असा विश्वास भिवंडी पूर्वचे शहर-जिल्हाध्यक्ष अफसर खान यांनी व्यक्त केला. विविध पक्षातील कार्यकर्ते मनसेमध्ये येण्यास उत्सुक आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरात आमची ताकद जरी कमी असली तरी विविध विषयांवर आंदोलन, धरणे करून तरुणांना आर्कषित करण्याचा प्रयत्न पक्षाच्यावतीने केला आहे. त्यामुळे पक्षाला यश मिळेल असा दावा खान यांनी केला आहे. खरे चित्र निवडणुकीच्यावेळी स्पष्ट होईल. भिवंडीत पक्षाची ताकद वाढली आहे. मुस्लीम व हिंदू असे अध्यक्ष दिले आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौज आमच्याकडे आहे. यावेळी मनसे परिवर्तन घडवेल अशा पद्धतीने व्यूहरचना तयार करण्याचे काम सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे.- डी. के. म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष. पाणी, रस्ते, बेकायदा बांधकामांमध्ये सर्वच पक्षातील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरु न भ्रष्टाचार केला आहे. आज कर्मचाऱ्यांना तीनतीन महिने पगार मिळत नाही. पालिका डबघाईला आली असून, या विरोधात आवाज उठवणार आहोत. - मदन पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष.पालिकेने शहरात १५ जलकुंभ बांधले. मात्र बहुतांश जलवाहिन्यांमध्ये पाणीच नाही. परिणामी नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या जलकुंभांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. - विकास जाधव, उपाध्यक्ष.