शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरातील वाहनांच्या टोलमुक्तीसाठी मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:38 IST

आनंदनगरनाक्यावर मानवी साखळी; मनसे-भाजप संघर्ष पेटणार

ठाणे : ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मनसे पुन्हा आक्रमक झाली असून आनंदनगर येथील टोलनाक्यावर एमएच ०४ या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, यासाठी मानवी साखळी करून मनसेने शनिवारी आंदोलन केले. आठ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ नंबर असणाऱ्या वाहनांकडून टोल घेण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, अजूनही ठाणेकरांकडून तो घेणे सुरूच असून आमदार जनतेशी खोटं बोलत आहेत, असा आरोपही मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.आनंदनगर टोलनाका ते कोपरी ब्रिजपर्यंत ही मानवी साखळी केली होती. भविष्यात ती टोलनाक्यापासून ते थेट माजिवड्यापर्यंत करण्यात येईल, असे सांगून ठाणेकरांना टोलमुक्त करण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मनसेचे आंदोलन असल्याने टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्तदेखील ठेवला होता. मानवी साखळी करून एमएच ०४ वाहनांना टोल बंद करावा, या आशयाचे फलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले. यापूर्वी सामाजिक संघटनांनीदेखील टोलमुक्तीसाठी मानवी साखळी आंदोलन केले होते.२०१४ मध्ये युतीचे सरकार आले, तेव्हा त्या सरकारने टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासनच ठरले. जनतेला टोल नको असल्याने मनसेने आता आक्र मक भूमिका घेऊन हे आंदोलन छेडले असल्याचे जाधव यांनी सांगितले. ८ दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच ०४ या वाहनांना टोलमुक्त केले असल्याचे जाहीर केले होते. तशाप्रकारच्या बातम्यादेखील प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, आमदारदेखील खोटे बोलत असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केल्यामुळे टोलवरून मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.ठाण्यातील नागरिकांना अर्ध्या किमीसाठी टोल भरावा लागत असून हे अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दर्शन देशमुख यांनी दिली. जिथे १० मिनिटांचे अंतर लागते, तिथे या टोलनाक्यामुळे ४५ मिनिटांचे अंतर लागत असून घरी जायला रोज उशीर होतो. त्यामुळे निदान ठाणेकरांसाठी तरी हा टोल बंद करावा, ही मनसेची मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आधीच ठामपाला कररूपाने पैसे भरतो. मात्र, आज ठाण्याच्या रस्त्यांची काय अवस्था आहे, हे सर्वांना माहीत आहे. सेवाच चांगली नसेल तर टोल तरी का द्यायचा, त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाMNSमनसेBJPभाजपा