शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 22:10 IST

तात्काळ कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: दहिसर टोलनाका हटवून लांब महामार्गावर नेण्यास भाजपाने विरोध चालवला असताना सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका येथे पाहणी करत विविध उपाययोजना सुचवत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. मुंबईकडे जाताना आणखी एक नवीन मार्गिका खुली करण्यासह टोलनाका मधील लोखंडी फ्रेम, बूथ, डिव्हायडर, खांब आदी तात्काळ काढून टाकण्यास तसेच टोल बूथ मागे पुढे करण्यास सांगितले असून त्यामुळे वाहतूक कोंडीतुन दिलासा मिळेल, असे सरनाईक म्हणाले.

दहिसर टोलनाका वरील वाहतूक कोंडी हि गंभीर समस्या बनली असून हि समस्या सोडवण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी टोलनाकाच हटवून स्थलांतरित करण्याची मागणी केल्यावर तसे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने वरसावे किंवा खाडी पुलाच्या पलीकडे  महामार्गावर टोलनाका नेण्याचे पर्याय आले. परंतु मीरा भाईंदर भाजपा सह वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील त्यास जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे टोलनाका हटवण्याचा शिवसेना शिंदे गट आग्रह धरत असताना भाजपा कडून मात्र पर्यायी जागांवर टोलनाक्यास विरोध होत आहे. दहिसर टोलनाका मुदत २०२९ पर्यंत आहे त्यामुळे टोलनाकाच लवकर बंद करण्याची मागणी देखील होत आहे.

दरम्यान, सोमवारी मंत्री सरनाईक यांनी दहिसर टोलनाका येथील पाहणी केली. यावेळी मुंबई पोलीस व महापालिका, राज्य रस्ते विकास मंडळ, मीरा भाईंदर महापालिका व पोलीस, टोल ठेकेदार कंपनी आदींचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुंबई कडे जाणाऱ्या मार्गिकेवर टोलनाका लगत असलेला रस्ता डिव्हायडर काढून तो रस्ता वाहनांना खुला करा. तेथील रस्त्यात ठेवलेल्या क्रेन, बाकडे हटवून मोकळा करा असे आदेश सरनाईक यांनी दिले. या शिवाय वाणिज्य वाहनां साठी मोजके टोलबूथ ठेऊन बाकी सर्व बूथ काढणे, टोलनाकाचे जाहिरात फलक व फ्रेम, डिव्हायडर, लोखंडी खांब आदी सर्व काढून रस्ता मोकळा करा. 

मुंबईतून मीरा भाईंदर कडे येणाऱ्या मार्गावरील टोलनाका हा पुढे न्यावा असे मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी काही अधिकारी यांनी डिव्हायडर, होर्डिंग आदी काढतो, दोन आठवड्याची मुदत द्या सांगितले असता मंत्री सरनाईक संतप्त झाले. काढा हो, किती वर्ष अजून वाट बघणार असे खडसावले.  मंत्री सरनाईक यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी व्हिडीओ कॉल वर चर्चा केली. याशिवाय पेणकरपाडा सिग्नल, पांडुरंगवाडी, मिरागाव भागातील महामार्गवर होणाऱ्या कोंडी बाबत अनेक सूचना देत कार्यवाही करण्यास मीरा भाईंदर महापालिका, वाहतूक पोलीस आदींना सांगितले आहे. टोलनाका हटवणार असे पुन्हा सांगतानाच तात्काळ नागरिकांना दिलासा देता यावा म्हणून ह्या उपाययोजना करत आहोत असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pratap Sarnaik suggests measures to ease Dahisar toll plaza traffic.

Web Summary : Minister Sarnaik ordered immediate actions to reduce Dahisar toll plaza congestion, including opening lanes and removing obstructions. Despite opposition, he insists on relocating the toll to ease traffic for commuters.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक