शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला भीषण आग; १० ते १२ दुकाने जळून खाक

By नितीन पंडित | Updated: March 19, 2026 14:48 IST

भिवंडीतील कशेळी परिसरातील चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

ठाणे-भिवंडी मार्गावरील कशेळी परिसर गुरुवारी दुपारी भीषण आगीच्या घटनेने हादरून गेला. येथील प्रसिद्ध चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्निचर मार्केटला अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे फर्निचरची सुमारे १० ते १२ मोठी दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, शेजारील भंगार गोदामालाही या आगीने आपल्या कचाट्यात घेतले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास चामुंडा कॉम्प्लेक्समधील एका दुकानातून धुराचे लोट येऊ लागले. फर्निचर आणि लाकडी साहित्य असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी शेजारच्या १०-१२ दुकानांना वेढले. हवेचा वेग आणि ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरत गेली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

तीन शहरांतील यंत्रणांची धाव

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिन्ही शहरांच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब ठरली.

नुकसान मोठे, आगीचे कारण गुलदस्त्यात

या आगीत व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे फर्निचर आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे. फर्निचर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात महागड्या सोफा सेट, बेड आणि कपाटांचे साठे होते, जे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर काही कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या घटनास्थळी 'कुलिंग'चे काम सुरू असून पोलीस आणि अग्निशमन दल आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive Fire Engulfs Bhiwandi Furniture Market, Shops Gutted

Web Summary : A major fire in Bhiwandi's Kasheli destroyed 10-12 furniture shops. Firefighters from Thane, Bhiwandi, and Kalyan controlled the blaze after three hours. While no lives were lost, the fire caused significant financial damage. The cause is still under investigation.
टॅग्स :fireआगBhiwandiभिवंडीAccidentअपघात