शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची चाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 17:17 IST

हा महामार्ग चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडत असून मानकोली येथे मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो.

नितीन पंडित

भिवंडी- भिवंडीतील मानकोली चिंचोटी महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अंजुरफाटा ते खारबावपर्यंत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवितांना वाहन चालकांना अनेक अडचणी येत आहेत . विशेष म्हणजे हा रस्ता बीओटी तत्वावर देण्यात आला असून सुप्रीम कंपनीतर्फे सध्या या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व टोल वसुली करण्यात येत आहे. हा महामार्ग चिंचोटी येथे मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडत असून मानकोली येथे मुंबई नाशिक महामार्गाला जोडला जातो.तसेच भिवंडीत या मार्गावर गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात विकसित झाला असल्याने या चिंचोटी मानकोली महामार्गावर अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ सुरु असते. या माध्यमातून टोल कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो मात्र आर्थिक फायदा होऊनही टोल वासून करणाऱ्या सुप्रीम कंपनीचे रस्त्याच्याया देखभाल दुरुस्तीकडे पुरता दुर्लक्ष होत आहे. 

या रस्त्यावर नेहमीच मोठमोठे खड्डे असल्याने या महामार्गावर नेहमीच अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र या रस्त्याची देखभाल करणाऱ्या सुप्रीम कंपनी त्यासंदर्भात काहीच देणं घेणं नसून केवळ आर्थिक नफा मिळविणे हे एकमेव उद्देश या टोल वसूल करणाऱ्या कंपनीने ठेवले आहे. विशेष म्हणजे राजकीय वरदहस्तामुळे सुप्रीम कंपनी स्थानिकांच्या गंभीर समस्येकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुचनांकडे नेहमीच दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश शासनाने त्वरित सुप्रीम कंपनीला द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.