शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Maharashtra Election 2019: विजयाची हॅटट्रिक साधणार की हुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 1:33 AM

Maharashtra Election 2019: बंडखोरीमुळे प्रतिष्ठा पणाला ;कल्याण पूर्वेत मतदारांचा कौल कोणाला?

- प्रशांत माने कल्याण : एकीकडे झालेली बंडखोरी आणि दुसरीकडे घटलेला मतदानाचा टक्का पाहता कल्याण पूर्व मतदारसंघात मतदारांचा कौल कोणाला, हे गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला जात असला तरी मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून गणपत गायकवाड हे निवडून आले आहेत. यंदा गायकवाड हे भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात आहे. तर, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे हे अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत. यात दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, यात गायकवाड हे विजयाची हॅट्ट्रिक साधणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार उभे ठाकले आहेत. यातील ११ उमेदवार अपक्ष आहेत. परंतु, भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड आणि अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे या दोघांमध्येच चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून प्रकाश तरे तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अश्विनी थोरात-धुमाळ रिंगणात आहेत.

एप्रिल-मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ८९ हजार २६९ मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी २७ हजार ५५५ मते मिळवली होती. तर, पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या वंचित आघाडीनेही चांगली मते मिळविली होती. त्यांचे उमेदवार संजय हेडावू यांना १७ हजार ९९७ मते मिळाली होती. त्यामुळे गुरुवारी होणाºया मतमोजणीदरम्यान कोणाच्या पारड्यात किती मते पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, यंदा मतदानाची टक्केवारी घटली आहे. मागील निवडणुकीत मतांची टक्केवारी ४५.१९ इतकी होती. परंतु, यंदा ४३.५५ टक्के मतदान झाले आहे. बंडखोरीमुळे चुरशीची लढाई झालेल्या या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती मते पडतात, हे गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

मताधिक्याकडे लक्ष

मागील दोन विधानसभा निवडणुकांत दोन्ही वेळेला अपक्ष निवडणूक लढविणारे गायकवाड हे विजयी झाले आहेत. २००९ मध्ये ते २४ हजार ४७६ मताधिक्याने निवडून आले. मात्र, २०१४ मध्ये त्यांना अवघे ७४५ मताधिक्य मिळाले होते.

‘जिथे सत्ता त्याला पाठिंबा’ हे समीकरण त्यांनी दोन्ही वेळेस ठेवले होते. परंतु, आता ते भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार बोडारे यांचे आव्हान आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Result Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकkalyan-east-acकल्याण पूर्व