शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

झुणका-भाकर केंद्रांच्या जागा ताब्यात घेण्याची लगबग

By admin | Updated: February 1, 2016 01:19 IST

शिवसेना-भाजपा युती सरकारने १९९५ मध्ये सुरु केलेली व राज्यात काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार असताना झुणका-भाकर केंद्र बंद करून त्याकरिता दिलेल्या जागा

राजू काळे,  भार्इंदरशिवसेना-भाजपा युती सरकारने १९९५ मध्ये सुरु केलेली व राज्यात काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार असताना झुणका-भाकर केंद्र बंद करून त्याकरिता दिलेल्या जागा ताब्यात घेण्याचे आदेश देऊन तब्बल १५ वर्षे उलटल्यावर आता त्या जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरु केल्या आहेत. महापालिका व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून केंद्रांच्या किती जागा ताब्यात घेतल्या व घेतल्या नसल्यास त्याची कारणे काय, अशी विचारणा विभागाने केली आहे.राज्यातील जनतेला पोटभर अन्न देण्याच्या उद्देशाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून झुणका-भाकर केंद्र योजना सुरु झाली होती. या केंद्रांकरिता मोक्याच्या जमिनी दिल्या होत्या. कालांतराने ही केंद्रे झुणका-भाकर केंद्र चालवण्याऐवजी अन्य खाद्यपदार्थ विकत असल्याचे निदर्शनास आल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काळात ही योजना गुंडाळण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने जून २००० मध्ये केंद्र बंद करून महापालिका व जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशांची आजमितीस काही जिल्ह्यांत अंमलबजावणी झालेली नाही. भाजपाच्या मंत्र्याने आघाडी सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केल्याने राज्यातील सत्तेत भागीदार असलेली शिवसेना नाराज होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ८ जानेवारी २०१६ रोजी काढलेल्या आदेशात राज्यातील झुणका-भाकर केंद्रांच्या किती जमिनी ताब्यात घेण्यात आल्या व जागा ताब्यात घेतल्या नसतील तर का घेण्यात आल्या नाहीत, अशी विचारणा सर्व महापालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या खात्याचे मंत्री गिरीष बापट यांच्या आदेशावरून रा. शं. नागरे यांनी हे आदेश जारी केले आहेत. २२ जानेवारीपर्यंत याबाबतचे अहवाल शासनाला पाठवायचे आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक झुणका-भाकर केंद्रांच्या जागा ताब्यात घेण्याचा आदेश दिला जाईल.