शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

देशातील जमीनीचे वाळवंटीकरण, जमीनीचा ऱ्हास होण्याचा वाढता धोका चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 11:36 PM

दिल्ली येथे २ ते १३ सप्टेंबर दरम्यान नोयडातील इंडिया एक्सपो येथे होणाराया युएनसीसीडीच्या १४ व्या सत्रात जगभरातुन विविध देशांचे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

धीरज परब  

मीरारोड - इसरो ने तयार केलेल्या माहिती नुसार २०११ ते २०१३ दरम्यान देशातील तब्बल ९०.४० दशलक्ष हेक्टर म्हणजेच २९.३२ टक्के भुभाग वाळवंटीकरण वा जमीनीचा राहास झालेला आहे. त्याच प्रमाणे जवळपास १.८७ दशलक्ष हेक्टर इतका अतिरीक्त भुभागाला देखील वाळवंटीकरण, जमीन राहासाचा धोका आहे. या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याची शक्यता आहे. देशासाठी अतिशय चिंताजनक बाब असल्याने युनायटेड नेशन कन्वेंशन टू कॉम्बेट डेझर्टिफिकेशन अर्थात युनएनसीसीडीचे १४ वे सत्र २ सप्टेंबर पासुन दिल्ली येथे पर्यावरण हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने आयोजित केले गेले आहे.दिल्ली येथे २ ते १३ सप्टेंबर दरम्यान नोयडातील इंडिया एक्सपो येथे होणाराया युएनसीसीडीच्या १४ व्या सत्रात जगभरातुन विविध देशांचे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. जगातील तसेच देशातील भुभागाचे झपाट्याने होणारे वाळवंटीकरण, जमीनीचा होणारा राहास यावर चर्चा तसेच आवश्यक उपाययोजनांवर विचार मंथन होणार आहे. जमीनीच्या होणाराया या राहासा मुळे दुष्काळा सह लोकांचे स्थलांतर तसेच आर्थिक विकास दराचे सुमारे अडिज टक्कायांनी नुकसान होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.देशातील ३२८ दशलक्ष हेक्टर जमीनी पैकी सुमारे १४७ दशलक्ष हेक्टर जमीन कोणत्या ना कोणत्या कारणाने राहासाच्या मार्गावर आहे. अशा परिस्थीतीत जमीन, वन आणि पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हे नियोजन प्रभावीपणे केले तरच देशातील प्रत्येक भागात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार आहे.ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका असुनही सागरी किनारपट्टीत वाढती बांधकामे - भराव, वन जमीनींचा केला जाणारा राहास, डोंगर आणि टेकड्यांची होणारी तोडफोड, नष्ट केले जाणारे नैसर्गिक जलाशय आणि जलप्रवाह आदी कारणांनी जमीनीचे वाळवंटीकरण, जमीनीचा राहास तसेच दुष्काळ वाढत चालला आहे. परंतु राजकारण्यांना या गंभीर संकटा पेक्षा बिल्डर लॉबी , उद्योजक व ठेकेदारीचे हित जपण्यात तसेच मतांची आकडेमोड करण्यातच जास्त स्वारस्य असल्याने या गंभीर बाबीं कडे त्यांच्या कडुन सोयीस्कर दुर्लक्ष करणे घातक असल्याची चिंता देखील सामाजिक संस्था तसेच अभ्यासकां कडुन केली जात आहे.जमीनीचे होणारे वाळवंटीकरण आणि राहास रोखण्यासाठी आधी वन, जलाशय व जलप्रवाह संरक्षित करणे अत्यावश्यक आहे. परंतु सरकार आणि राजकारणी मात्र सोयीचे नियम तयार करण्यासह सर्रास परवानग्या देत असल्याने वन, जलाशय व जलप्रवाह तसेच डोंगर नष्ट केले जात आहेत. बेकायदा केल्या जाणाराया राहासाची आकडेवारी देखील मोठी आहे.केंद्र सरकार कडे देशभरातील नष्ट करण्यात आलेले चा अतिक्रमण झालेल्या जलाशय तसेच जलप्रवाहांची माहितीच नसल्याचे युएनसीसीडी आणि टेरी ने आयोजित केलेल्या पत्रकारांसाठीच्या प्रशिक्षण शिबीरा वेळी समोर आले होते. पर्यावरण मंत्रालयाच्या वाळवंटीकरण विभागाच्या संचालक अनुराधा सिंह यांनी देखील देशाच्या ३० टक्के जमीनीचा राहास झाल्याचे मान्य करत केंद्र व राज्य शासनांनी सर्व प्रकारच्या भूमी आणि पाणी संबंधित योजनां करीता आवश्यक आर्थिक तरतुद केल्याचा दावा केला होता. युएनसीसीडी सोबत या वर कार्य सुरु असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.ग्राम विकास मंत्रालयाच्या भू संसाधन विभागाचे संयुक्त सचीव उमाकांत यांनी २०.४५ दशलक्ष हेक्टर जमीन सुरक्षित श्रेणी मध्ये आणल्याचा दावा करत उर्वरीत ६३ दशलक्ष हेक्टर जमीन देखील सुरक्षित क्षेत्रात आणण्यासाठी उपाययोजना केल्या करायच्या आहेत असे म्हटले होते. टेरीच्या वन - जैव वविधिता विभागाच्या वरिष्ठ डॉ. प्रिया सेठी यांनी देखील जमीनीच्या राहासामुळे देशाच्या आर्थिक विकास दराचे अडिज टक्के नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले होते. तर निवृत्त केंद्रिय वन विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. व्हि. शर्मा यांनी केंद्र शासन देशात वन वाढल्याची देत असलेली आकडेवारी दिशाभुल करणारी असल्याचे सविस्तर माहिती सह नमुद केले. 

टॅग्स :landslidesभूस्खलनFarmerशेतकरी