शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:16 IST

------------ कल्याणमध्ये घरफोडी कल्याण : पूर्वेतील कर्पेवाडी म्हसोबा चौक ओमनिवास चाळीत राहणारे दीपक दिवटे यांच्या बंद कुलूप तोडून चोरट्यांनी ...

------------

कल्याणमध्ये घरफोडी

कल्याण : पूर्वेतील कर्पेवाडी म्हसोबा चौक ओमनिवास चाळीत राहणारे दीपक दिवटे यांच्या बंद कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील टीव्ही चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी मंगळवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------

दुचाकी चोरी

कल्याण : पूर्वेतील म्हसोबा चौक परिसरात राहणारे सुयोग पाटील यांनी त्यांची दुचाकी रेल्वेस्थानकातील फलाट नंबर सातच्या बाहेर पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना १६ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते रात्री ९ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी दाखल झालेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------------------

जाब विचारल्याने मारहाण

डोंबिवली : पदपथाच्या बाजूला दुचाकी आडवी उभी केल्याचा जाब विचारला म्हणून गिरीश जोशी यांना गणेश घोंगडे याने लोखंडी वस्तूने मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता पश्चिमेतील ठाकूरवाडी रिक्षा स्टॅण्डजवळ घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात घोंगडे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------

दांडक्याने प्रहार

डोंबिवली : धक्का मारला म्हणून विचारणा केली असता याचा राग आल्याने एका अनोळखी व्यक्तीने कुणाल जोशी यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केल्याची घटना पश्चिमेकडील अंबिकानगरमध्ये मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसात जोशी यांनी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करत पोलिसांनी अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

-------------------------------------------

मारण्याची धमकी

डोंबिवली : भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली म्हणून मुजमील पिरजादे आणि सईद शेख यांना चौघांनी घरात घुसून दांडक्यांनी मारहाण केली आणि पुन्हा मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पूर्वेतील रमाबाई आंबेडकर वसाहतीत मंगळवारी दुपारी ४ वाजता घडला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून मुजमील याचा भाऊ मकदूम, सोहेल, साहिल, अज्जू या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------------

कॅमेरे चोरीला

डोंबिवली : पश्चिमेतील कोपरगावात राहणाऱ्या करण शाम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८१ हजारांचे कॅमेरे चोरून नेले. ही घटना मंगळवारी पहाटे ४.३० ते ५ दरम्यान घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------

रिक्षाची चोरी

कल्याण : युसूफ अन्वर शेख या रिक्षाचालकाने त्याची रिक्षा रविवारी रात्री तो राहत असलेल्या पश्चिमेतील जुना मच्छी मार्केट किडवाई रोडवर उभी केली होती. तेथून ती रिक्षा मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------------------------------

अज्ञात कारणावरून मारहाण

कल्याण : पूर्वेतील ग्रेट कल्याण धाब्यासमोर कमल थापा हे फालुदा गाडीवर फालुदा खात असताना त्यांना अनोळखी कारणावरून विकास सपकाळ, प्रथमेश धोत्रे, आशिष ब्राह्मणे आणि रोशन शर्मा या चौघांनी शिवीगाळ करीत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजता घडली. याप्रकरणी थापा यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

--------------------------

डोंबिवलीत दुचाकी चोरी

डोंबिवली : पूर्वेतील मानपाडा रोडवरील शंकेश्वर नगर अपार्टमेंट डी मार्टजवळ उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दुचाकीमालक मंगेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------