शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही रोगावर कल्याण-डोंबिवलीत झटपट इलाज

By admin | Updated: January 21, 2016 02:36 IST

एकीकडे केबलवरून मंत्र-तंत्र, जादूटोणा, वशीकरणाच्या जाहिरातींचा मारा सुरू असतानाच कल्याण-डोंबिवलीत सर्दी-तापापासून गुप्तरोग

आकाश गायकवाड, डोंबिवलीएकीकडे केबलवरून मंत्र-तंत्र, जादूटोणा, वशीकरणाच्या जाहिरातींचा मारा सुरू असतानाच कल्याण-डोंबिवलीत सर्दी-तापापासून गुप्तरोग-एड््सपर्यंत वेगवेगळ्या रोगांवर हमखास इलाज करणाऱ्या वैदूंचे पेव फुटले आहे. गल्लोगल्ली अशा वैदूंनी दुकाने थाटली आहेत आणि अवघ्या २० ते २५ रुपयांपासून जडीबुटी, पत्रिका पाहून, मंत्र टाकून त्यांचे उपचार सुरू आहेत. सर्दी-पडशापासून गुप्तरोग ते एड्ससारख्या आजारांवर उपचाराची जाहिरात हे वैदू करीत आहेत. कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या, पण हात लावीन तो उपचार करीन, अशी स्वत:ची ख्याती सांगणाऱ्या या बोगस वैदूंवर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे प्रशासन किंवा पोलीस कारवाई करत नसल्याने आधीच बिघडलेले नागरिकांचे आरोग्य आता सलाइनवर गेल्याचे दिसत आहे.वातावरणातील सततच्या बदलांमुळे आणि प्रदूषणामुळे कल्याण-डोंबिवलीत ताप, सर्दी, खोकला अशा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तापाने फणफणलेले पेशंट दररोज मोठ्या संख्येने दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. या बेहाल स्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सध्या परप्रांतांतून आलेल्या बोगस वैदूंनी कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी तंबू ठोकून उपचार सुरू केले आहेत. स्वस्तात, जडीबुटीच्या आधारे, भविष्य सांगत ते हमखास उपचाराची गॅरंटी देत असल्याने त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे वैदू कोणत्याही रोगावर अवघ्या २० ते ५० रु पयांत जडीबुटीद्वारे उपचार करण्याचे फ्लेक्स लावतात. दीर्घ आजाराने हैराण असलेले आणि खाजगी डॉक्टरांची फी परवडत नसलेले रुग्ण आशेने त्यांच्याकडे जातात. आजाराचे निदान झाल्यावर मात्र वैदू औषधांसाठी मोठ्या रकमेची मागणी करतात. ग्रामीण भागातील रु ग्णांच्या असहायतेचा, अज्ञानाचा फायदा घेऊन आजारपणाच्या नावाखाली मोठी भीती दाखवून वैदूंनी लुटण्याचा मोठा धंदा सुरू केला आहे. प्रसंगी जीवाची भीती दाखवून उपचाराच्या नावाखाली पैसे उकळले जातात, अशी माहिती ग्रामस्थांनी पुरवली. त्यामुळे ‘रोग परवडला, पण इलाज नको,’ अशी वेळ या रु ग्णांवर ओढवते. या वैदूंवर कारवाई करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र, या विभागाला अजूनही त्याचे गांभीर्य जाणवलेले नाही. त्यामुळे या वैदूंचे फावले आहे.