शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 05:14 IST

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून  भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :   फेक नॅरेटिव्ह पसरविण्यात विरोधकांसोबत काही एनजीओ कार्यरत होत्या. गडचिरोलीतील शहरी नक्षलवाद्यांनी आता या एनजीओंमध्ये शिरकाव केला आहे. तेच सरकारविरोधी काम करीत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर शिवसेनेचे १९ टक्के मतदान होते त्यापैकी १४.५ टक्के मतदान हे शिंदेसेनेला  आहे, तर साडेपाच टक्के उद्धवसेनेला. म्हणजेच उर्वरित मतदान कुठले आहे, ते सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आता जागरूक राहा. यापुढे पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर कोणीही गाफील राहू  नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून  भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवीत आहेत. डावखरे यांच्या प्रचारासाठी  रविवारी ठाण्यात झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी आमदार डावखरे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण,  भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत गाफीलपणा भोवल्याचे कबूल  करत मुख्यमंत्री म्हणाले,  विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाचे खरे नॅरेटिव्ह तयार करून विजय मिळवावा. मोदी द्वेषाने पछाडलेले  हे शहरी नक्षलवादी मोदी हटाव म्हणून घोषणा देत होते; पण मोदी हटले नाही आणि ते पुन्हा सत्तेत आले. मात्र, चांगले काम  करूनही खोटे नॅरेटिव्ह पसरविण्यात काँग्रेस यशस्वी ठरली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

कीर कीर कशाला...डायरेक्ट डावखरे  गेल्यावेळी संजय मोरे आणि नजीब मुल्ला हे दोन्ही प्रतिस्पर्धी होते. ते उमेदवारही महायुतीत आहेत. त्यामुळे, ८५ टक्क्यांऐवजी आता १०० टक्के मतदान निरंजन डावखरे यांना मिळेल, असे भाकीत मुख्यमंत्र्यांनी केले.  समोर उमेदवार कोण आहे, त्याची कीर कीर कशाला... डायरेक्ट डावखरे यांनाच पसंती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

विरोधकांना केले तडीपार : फडणवीसलोकसभा निवडणुकीत काही लोकांनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळून, कोकणाने त्यांना तडीपार केले. कोकणातील साडेसहापैकी साडेपाच जागा महायुतीने जिंकल्या. आता या निवडणुकीतही महायुतीला आशीर्वाद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील दोन, कोकण आणि नाशिक या चारही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही  फडणवीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस