शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिवीर इंजेक्शनची वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी पूर्णत: भरली गेली आहेत. दुसरीकडे, कोरोनावर ...

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी पूर्णत: भरली गेली आहेत. दुसरीकडे, कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली असताना किमतीतील फरकांमुळे रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महापालिका हद्दीत हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज आढळून येत आहेत. सध्या साडेनऊ हजारांहून अधिक रुग्ण मनपासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काही रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत असली तरी फुप्फुसांत संसर्ग झालेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोर्स दिला जात आहे. संबंधित रुग्णाला या कोर्समध्ये दिवसाला एक अशी सहा इंजेक्शन दिली जातात. रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रुग्णासाठी प्रभावी ठरत असले तरी या इंजेक्शनची उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. या इंजेक्शनची एमआरपी किंमत साडेचार हजार रुपयांच्या आसपास आहे. पण, सरकारी नियमानुसार केडीएमसीच्या रुग्णालयांत हे इंजेक्शन प्रती १२०० रुपयांप्रमाणे उपलब्ध होत आहेत तर काही खासगी रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन प्रति पाच ते साडेपाच हजारांपर्यंत मिळत असल्याने हे इंजेक्शन खर्चिक पडते. सरकारी नियमानुसार हा कोर्स १३ हजारांमध्ये होणे अपेक्षित असताना खासगी उपचारपद्धतीत त्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावात कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मनपाची रुग्णालये रुग्णवाढीमुळे भरली असल्याने त्या ठिकाणी सर्वसामान्यांनाही बेड मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. एकाच कुटुंबातील दोन ते तीन जण उपचार घेत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या या इंजेक्शनची मागणी वाढल्याने किमती सरकारी नियमानुसार आकारण्यात याव्यात, अशी मागणी रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक करत आहेत.

----------------------------------------------------

पुरवठा वाढविण्यावर भर

मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी ही काही प्रमाणात घटली होती. त्यामुळे काही रुग्णालयांनी पुरवठा करण्यावर देखील भर दिला नव्हता; परंतु अचानक रुग्ण संख्या वाढल्याने आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढल्याने आता पुरवठा वाढविण्यावर भर देण्यात आला असून त्यामुळे भविष्यात इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

------------------------------------------------------