शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ दीड तास जिवावर बेतला!

By admin | Updated: December 26, 2015 01:06 IST

रमेश गुंजाळ यांच्यावर हल्ला झाला, त्या वेळेस मोरिवली उद्यानात बसलेल्या नागरिकांची आणि मोरिवलीच्या नाक्यावर नाका कामगारांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. पण, हल्ला

अंबरनाथ : रमेश गुंजाळ यांच्यावर हल्ला झाला, त्या वेळेस मोरिवली उद्यानात बसलेल्या नागरिकांची आणि मोरिवलीच्या नाक्यावर नाका कामगारांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. पण, हल्ला झाल्यावर त्यांना लागलीच उपचारासाठी नेण्यात आले नाही. जेथे हलविण्यात आले, त्या रुग्णालयात उपचाराची पुरेशी सोय नव्हती. तब्बल दीड तासानंतर त्यांना कल्याणच्या रुग्णालयात हलविण्यात आले. हा दीड तासच गुंजाळ यांच्या जिवावर बेतला. सकाळी ९.३० वाजता हल्ला झाल्यावर साधारण १० ते १५ मिनिटे गुंजाळ तेथेच पडून होते. त्यानंतर, त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी गाडीच मिळाली नाही. अखेर, तेथे असलेल्या टेम्पोतून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचाराची पुरेशी सुविधा नसल्याने पुन्हा त्यांना ९.५५ वाजता उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. तेव्हाही त्यांना लागलीच नेण्यासाठी कोणतीच गाडी उपलब्ध नव्हती की, रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे त्यांना एका रिक्षातूनच उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. रक्तस्राव सुरूच राहिल्याने आणि हृदयाचे ठोके कमी होत गेल्याने पुन्हा त्यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तोवर, सकाळचे ११ वाजले. हल्ला झाल्यापासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होईपर्यंत तब्बल दीड तास गेला. याच काळात योग्य उपचार न मिळाल्याने गुंजाळ यांची प्रकृती ढासळली आणि जेव्हा खऱ्या अर्थाने उपचार सुरू करण्यात आले, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ना शॉकचा उपयोग, ना इंजेक्शनचा कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा गुंजाळ यांची प्रकृती पूर्ण ढासळलेली होती. शरीरात रक्तपुरवठा करणेही अवघड जात होते. उपचाराला कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. हृदयाचे ठोकेदेखील मिळत नसल्याने त्यांना पन्नासपेक्षा अधिक इलेक्ट्रीकचे झटके देऊन हृदयक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न झाला.एवढ्यावरच न थांबता मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी जी इंजेक्शन दिली जातात, ती चार इंजेक्शनही त्यांना देण्यात आली. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. अखेर, डॉक्टरांचे अडीच तासांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि गुंजाळ यांना मृत घोषित करण्यात आले.