शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोरखपूर, वाराणसी, पाटलीपुत्र रेल्वे गाड्यांचे आरक्षण ४ डिसेंबरपर्यंत फुल्ल, दक्षिणेकडे प्रतिसाद कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:09 IST

प्रवासी पडू लागले बाहेर : वेटिंग तिकीट मिळणेही झाले बंद, तरीही रांगा कायम

अनिकेत घमंडीडाेंबिवली : कोरोनाच्या काळात २२ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक १५ जूनपर्यंत बंद होती. त्यानंतर, जसजसे अनलॉक सुरू झाले, तसतसे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवासी वाहतूक टप्प्याटप्पाने देशभरात सुरू झाली. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमधून अनलॉक-५ च्या केंद्राच्या घोषणेनंतर प्रवासी हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झाली. नोव्हेंबर २० ते ४ व ९ डिसेंबर या कालावधीतील लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या आरक्षणाचा धांडोळा घेतला असता उत्तरेकडे गोरखपूर, वाराणसी, पाटलीपुत्र मार्गावर मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पी.डी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार २० नोव्हेंबर ते ४ व ९ डिसेंबर या कालावधीत त्या भागात जाणाऱ्या गाड्यांची आरक्षण तुलनेने दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांपेक्षा अधिक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थ्री टायर एसी, स्लीपर, फर्स्ट, सेकंड सीटिंग आरक्षण आणि सामान्य डबे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. 

या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्लसीएसएमटी ते वाराणसी मार्गावर क्रमांक ०१०९३ महानगरी विशेष गाडी, ०१०१५ एलटीटी गोरखपूर, ०२१४१ एलटीटी पाटलीपुत्र आणि ०२५३४ ही सीएसएमटी लखनऊ तसेच ०२५४२ या एलटीटी-गोरखपूर या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आरक्षणे २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत फुल्ल असून बहुतांश गाड्यांचे वेटिंग तिकीटही आरक्षण तिकीट खिडक्यांवर मिळणे बंद झाले आहे. याखेरीज आठवड्यातून तीन वेळा असलेल्या १०५५ एलटीटी-गोरखपूर या गाडीचे आरक्षण जवळपास फुल्ल झाले आहे.

या मार्गावरील गाड्यांमध्ये आरक्षण कमीउत्तर, दक्षिणेबरोबरच पुणे, नाशिक, मनमाड, औरंगाबाद, सोलापूर या मार्गांवरदेखील लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्या असल्या, तरी तूर्तास आरक्षणाचे प्रमाण कमीअधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे